Friday, April 26, 2024
Homeजळगावमहामार्गांवर अपघातप्रवण क्षेत्रे निश्चितीचे आदेश

महामार्गांवर अपघातप्रवण क्षेत्रे निश्चितीचे आदेश

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्हयात बहुतांश महामार्गांवर वाढलेल्या झाडांचे अतिक्रमण, वळणे, उतार, गाव, शाळा वा अन्य रस्ते सुरक्षाविषयक दिशा दर्शक फलकांची झालेली दुरावस्था लक्षात घेता

शासकीय, निमशासकीय, कार्यालये, आस्थापना, बँका, विद्यापीठ, महाविद्यालयात विविध कामासाठी येणारे नागरीक, विद्यार्थ्यांना ‘नो हेल्मेट, नो एंन्ट्री’ तत्व अवलंब करण्याचे लेखी निर्देश देण्यात यावेत. महामंडळाच्या एसटी बसेस ह्या इतरत्र न थांबवता थांब्यावरच थांबविण्यात याव्यात.

- Advertisement -

-अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी

जिल्ह्यात अपघातांचे प्रमाणात 23 टक्क्यांनी घट झाली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये 453 अपघातात 301 व्यक्तींचा मृत्यु तर 332 व्यक्ती जखमी झाले आहेत. सर्वाधिक 12 अपघात पारोळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत, जळगाव एमआयडीसी हद्दीत 10 अपघात झाले आहेत.

-श्याम लोही, आरटीओ, जळगाव

अपघात स्थळे निश्चित करुन सूचना फलक लावण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहे.

‘दैनिक देशदूत’ ने या संदर्भात दि.25 सप्टेबर रोजी ‘अतिक्रमणामुळे अपघातांना मिळतेय आमंत्रण’ या आशयाखाली वृत्त प्रसिद्ध केेले होते.

याची दखल जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरून घेण्यात आली आहे. वाहनचालकांसाठी सूचनांसह रस्ते अपघातात जखमी होणार्‍या नागरीकांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गावर एरंडोल अथवा पारोळा याठिकाणी ट्रामा केअर सेंटर उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत दिले.

जिल्ह्यातील महामार्गावर आणि अन्य रस्ते अपघातांवर नियंत्रणासाठी महामार्गावर अपघात होउ नयेत यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने अपघात स्थळे दर्शविणारे फलक वाहनचालकांना दिसतील अशा ठिकाणी तात्काळ लावण्यात यावेत.

अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी जि.प.सीइओ डॉ. बी. एन. पाटील, ‘न्हाई’चे प्रकल्प संचालक सी. एम. सिन्हा, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक देविदास कुनगर, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे, उप अभियंता स्वाती भिरुड आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या