रक्तदात्यांची साखळी तयार करणारा अवलिया

जळगाव – Jalgaon

रक्तदान हेच श्रेष्ठदान असे म्हटले जाते पूर्वीपेक्षा रक्तदानाबाबत सद्याच्यास्थितीत मोठी जनजागृती झाली असून नागरिक स्वत: रक्तदानासाठी सरसावू लागले आहे. शहरातील रक्तदाता म्हणून शहरातील विवेक महाजन यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी आपल्या शालेय जीवनापासूने ते आतापर्यंत अनेकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले आहे. या अवलियाने आतापर्यंत त्यांनी आपले नातेवाईक, मित्र मंडळीतील सुमारे हजारपेक्षा अधिक जणांना रक्तदानासाठी उपरोक्त केले आहे.

वेळेवर रक्त उपलब्ध झाल्याने अनेकांचे जीव वाचविले जात असल्याने शास्त्रासह आताच्या एकवीसाव्या शतकात देखील रक्तदान हे श्रेष्टदान समजले जाते. रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी 2004 पासून जागतिक आरोग्य संघटना 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिवस साजरा करत आहे. जिल्ह्यात अनेक रक्तदात्यांनी समाजासाठी व रक्तदानाची चळवळ उभी करण्यासाठी योगदान देत आहे. त्यातील एक म्हणजेच विवेक महाजन हा तरुण आपल्या वयाच्या 18 वर्षापासून सातत्याने रक्तदान करीत आहे.

रक्तदानासोबतच आपल्या परिसरातील मित्रमंडळींसह नागरिक, नातेवाईकांना तसेच शालेय जीवनापासून ते महाविद्यालयील मित्रांना रक्तदानाचचे महत्व पटवून देत त्यांना रक्तदान करण्यासाठी प्रेरित करीत आहे. तसेच आजारपण, शस्त्रक्रिया, अपघात किंवा थैलेसिमिया, सिकल सेल अशा आजारांनी ग्रस्त असलेल्यांना रक्ताची प्रचंड आवश्यकता असते. अशा रुग्णांना रक्तपेढ्यांमधून रक्ताचा पुरवठा केला जातो मात्र काही रुग्णांना रक्तदात्याच्या शरिरातील ताज्या रक्ताची आवश्यकता असते. मात्र अशा परिस्थितीत रक्तदाते विवेक महाजन यांनी तयार केलेल्या साळखीच्या माध्यमातून ते तात्काळ गरजूला रक्त उपलब्ध करुन देत आहे.

जिल्हाभरात निर्माण केले रक्तदाते

जिल्हाभरातील रुग्ण उपचारासाठी शहरात दाखल होत असतात. त्यांना रक्ताची आवश्यकता निर्माण झाल्याने अनेकवेळा त्यांची फरफट होत आहे. अशा परिस्थितीत महाजन हे पुढाकार घेतात. तसेच जिल्हाभरात त्यांनी रक्तदाते तयार केले असून त्याच्या माध्यमातून ते गरजूंना रक्त उपलब्ध करुन देत आहे.

शिबीरांच्या माध्यमातून रक्तदानाची चळवळ

महाजन यांनी अनेक संघटना, संस्थांच्या माध्यमातून रक्तदानाबाबत नागरिकांना प्रोत्साहीत करीत आहे. त्यांचे मित्र मंडळी देखील कुठलाही जात-पात, धर्म चा विचार न करता रक्तदानासाठी पुढाकार घेत आहे. तसेच महापुरुषांची जयंती, पुण्यतिथीचे औचित्ससाधून ते रक्तदान शिबीरांचे आयोजन करीत रक्तदानासाठी चळवळ तयार करीत आहे.

थॅलेसिमीयासह प्लाझ्मा दान करुन वाचविले अनेकांचे जीव

थॅलेसिमीया व सिकल सेल या आजाराने ग्रस्त असलेल्यांना दर महिन्याला रक्ताची आवश्यकता असते. परंतु कोरोनाकाळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत रक्तदात्यांच्या मदतीने महाजन यांनी या आजाराने ग्रस्त असलेल्यांना रक्ताचा पुरवठा करीत सामाजिक दायित्व जोपासले. तसेच प्लाझ्मा दानाबाबत त्यांनी सामाजातील नागरिकांना त्यांनी प्लाझ्माचे डोनर उपलब्ध करुन देत कोरोनाकाळात देखील अनेकांची जीव वाचविण्यास मदत केली.

सोशल मिडीयातून तयार केली साखळी

विवेक महाजन यांनी जिल्ह्यात सोशल मिडीयाच्या माध्यमातून रक्तदात्यांची साखळी तयार केली आहे. प्रत्येक तालुक्यात त्यांनी रक्तदात्यांच्या नेहमी ते संपर्कात असून ते गरजूंना रक्त उपलब्ध करुन देत आहे. आतपर्यंत त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सुमारे हजारपेक्षा अधिक रक्तदाते आपल्यासोबत जोडून एक साखळी तयार केली आहे.