Friday, April 26, 2024
Homeराजकीयघनकचरा प्रकल्पाचा नवीन सुधारित आराखडा !

घनकचरा प्रकल्पाचा नवीन सुधारित आराखडा !

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरातुन संकलित होणार्‍या कचर्‍यावर प्रक्रीया करण्यासाठी निमखेडी शिवारात उभारण्यात येणार्‍या नियोजित प्रकल्पस्थळाला उपमहापौर सुनिल खडके यांनी मंगळवारी भेट दिली.

- Advertisement -

महानगरपालिका नियोजित प्रकल्पस्थळी डंपिग केलेल्या कचर्‍याचे बायोमायनिंग आणि प्रकल्प उभारणी या दोहोंसाठी स्वतंत्र मक्ते देण्यात आलेले आहेत.

मात्र मुदत संपुनही हे दोन्ही प्रकल्प पुर्ण झाले नसल्याने उपमहापौर यांनी नाराजी व्यक्त केली स्थळ भेटी नंतर त्यांनी आयुक्त सतिश कुलकर्णी यांचीही भेट घेतली.

प्रकल्प आराखडयात फेरबदल करणे आवश्यक झाल्याने प्रकल्पाचे काम रखडल्याची माहिती समोर आली सुधारित आराखडा तयार करुन तो त्वरीत महासभेसमोर ठेवण्याच्या सुचना उपमहापौर खडके यांनी प्रशासनास दिल्या आहेत.

प्रकल्पस्थळी डंपिग करण्यात आलेल्या कचर्‍याचे बायोमायनिंग करण्यासाठी ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंन्ट यांना मक्ता दिलेला आहे. मात्र कोरोना काळामुळे हे काम अद्याप 63 टक्के इतकेच होऊ शकलेले आहे.

अशी माहिती प्रकल्प अभियंता योगेश बोरोले यांनी दिली परंतु हे दोन्ही कामे संशयास्पद असल्याचे उपमहापौर खडके यांनी आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर कळविले आहे.नविन कचरा डंप करतांना प्रकल्पाला अडथळा निर्माण होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सुचना उपमहापौरांनी केल्या.

उपमहापौरांनी यावेळी प्रकल्पाजवळील लोकवस्तीला भेट दिली त्यावेळी लोकांनी बायोमायनिंगपुर्वी परिसरात दुर्गंधी आणि चिलटे किटक यांचा त्रास मोठया प्रमाणावर सहन करावा लागत होता अशी आशी व्यथा मांडली यावर प्रशासकीय दिरंगाई बद्दल उपमहापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

साइट वरील प्रत्यक्ष स्थिती आणि जुन्या आराखडयात असलेल्या काही त्रुटी विचारात घेऊन प्रकल्प अहवालात काही सुधारणा आवश्यक झाल्या आहेत.

त्यामुळे प्रकल्प उभारणीच्या कार्यात अडसर असल्याची बाब समोर आल्याने प्रकल्प अहवाल सुधारीत करण्याचा प्रस्ताव निर्णयासाठी त्वरीत महासभेसमोर ठेवण्याच्या सुचना उपमहापौरांनी दिल्या आहेत.बायोमायनिंग प्रक्रीयेत प्लास्टीक आणि घनपदार्थ वेगळे करुन उरलेल्या कचर्‍यापासुन खतनिर्मिती केली जाते हा मक्ता नोव्हेंबर 2019 मध्ये ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंन्ट यांना देण्यात आला.

1 लक्ष क्युबीक टन कचर्‍याचे बायोमायनिंग करण्याचे लक्ष्य होते. झालेल्या कामाचे इंजिनिअरींग कॉलेज मार्फत ऑडीट करुन घेण्यात आले. सहा महिने इतकीच मुदत असतांनाही वर्ष उलटुनही काम पुर्ण झालेले नाही. प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीचा 12 कोटी रुपयांचा मक्ता लक्ष्मी कन्ट्रक्शन कंपनी यांना सप्टेंबर 2019 मध्ये देण्यात आलेला आहे .

मात्र स्ट्रक्चर आणि शेड यांची मापे, प्रकार हा या प्रकल्पाच्या दृष्टीने अनुकूल नसल्याने तसेच अवजड वाहने आणि मशिनरी याव्दारे काम होणार असल्याने फ्लोरींग कॉक्रीटचे असणे गरजेचे आहे. मात्र मुळ आराखडयात शहाबादी फरशी दाखविलेली आहे. त्यामुळे प्रकल्प आराखडयात (डि.पी.आर ) दुरुस्ती करणे भाग असल्याचेही खडके यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या