Wednesday, April 24, 2024
Homeजळगावमहानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाईत हातगाड्या जप्त

महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाईत हातगाड्या जप्त

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

मनपा अतिक्रमण विभागाने आपली कारवाई तीव्र करीत सोमवारी सुभाष चौक, इस्लामपुरा, फुले मार्केट, चौबे शाळा परिसरातून

- Advertisement -

5 हातगाड्या, भाजीपाला व इतर साहित्य जप्त करण्यात आले. उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

सणासुदीचे दिवस असल्याने सध्या दिवाळीपयर्र्त मनपाकडून विविध कारवाया शिथिल करण्यात आल्या.

सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन

बाजार परिसरात अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे सर्रास उल्लंघन, नियम, अटींचे उल्लंघन होतांना दिसून येत आहे.

अनेक दुकानांवर नियमापेक्षा अधिक प्रमाणात गर्दी होत आहे. गर्दीला दुकानदार, व्यावसायिकाकडून कंट्रोल होत नाही, परिणामी दुकानदार गर्दीकडे दुर्लक्ष करतात तसेच अतिक्रमण धारक सणासुदीनिमीत्त जागा मिळेल तेथे आपला व्यवसाय करीत असतात.

त्यामुळे अतिक्रमण शहरात भर रस्त्यांवर, वर्दळीच्या ठिकाणी वाढली आहे. त्यास अटकाव घालणे गरजेचे आहे. फुले मार्केट परिसरात विविध साैंंदर्य प्रसाधने, कपड्यांची दुकाने, चप्पल दुकाने भर रस्त्यावर थाटलेली असतात .

अशा दुकानदारांचे साहित्य मनपा अतिक्रमण विभागाने जप्त केले. तसेच सुभाष चौकात भवानी मातेच्या मंदिराजवळून एक हातगाडी तसेच फुले मार्केटमधून एक, सुभाष चौक, चौबे शाळा, इस्लामपुरा भागातून एक असे 5 हातगाड्या भाजीपाला व इतर साहित्यासह जप्त करण्यात आले.

जप्त करण्यात आलेला माल व हातगाड्या दंडात्मक कारवाई पावती फाडून करण्यात आली. कारवाई प्रसंगी या विभागाचे नाना कोळी, किशोर सोनवणे, राजु वाघ, संजय ठाकूर, पंकज कोळी, हुसनोद्दीन भिस्ती, भानुदास ठाकरे आदी सहभागी होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या