Wednesday, May 8, 2024
Homeजळगावअतिक्रमण विभागाची कारवाई

अतिक्रमण विभागाची कारवाई

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

अतिक्रमण विभागाने शनिवारी फुले मार्केट, बळीराम पेठ, गिरणा टाकी परिसरात कारवाई करीत 3 ते 4 हातगाड्या जप्त केल्या.

- Advertisement -

तसेच इतर भाजीपाला साहित्य जप्त करण्यात आले. उपायुक्त वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

शनिवारी सकाळपासून मनपा अतिक्रमण विभागाने कारवाईस आरंभ केला. फुले मार्केट, बळीराम पेठ, गिरणा टाकी परिसरात कारवाई करीत 3 ते 4 हातगाड्या जप्त केल्या.

तसेच इतर भाजीपाला साहित्य जप्त करण्यात आले. भाजीपाला हा नाशवंत असल्याने तो त्वरित दंडात्मक कारवाई करुन परत सोडवावा लागतो.

याप्रमाणे काहीचे साहित्य जप्त करण्यात आले. गिरणा टाकी परिसरात 2 ते 3 हातगाड्या जप्त करण्यात आल्या होत्या.

फुले मार्केटमध्ये मात्र निष्प्रभ

मात्र शहरातील महात्मा फुले मार्केटसह इतर परिसरात अधिकार्‍यांच्या गैरहजेरीत उपस्थित कर्मचार्‍यांकडून कारवाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा अनुभव वारंवार येत असतो. त्यामुळे जणु अधिकारी नसले तर कारवाई होणार नाही काय असा प्रश्न हॉकर्ससह दुकानदार तसेच नागरिकांकडून करण्यात येत आहे.

आमच्या प्रतिनिधीने मार्केट परिसरात अतिक्रमण विभागाच्या कारवाईचा आढावा घेतला असता काही वेळा फुले मार्केटमध्ये मनपाचे वाहन ट्रॅक्टर लावलेले असते, कर्मचारीही असतात ते कुठेतरी एका ठिकाणी बसलेले असतात असे चित्र दिसून येते.

यामुळे अधिकार्‍यांविना कारवाईच होणार नाही का असा चुकीचा मेसेज नागरिकांसह दुकानदारांना जातो असे होवून अतिक्रमण विभागाने अधिकारी असो वा नसो, नेहमी सतर्क राहून आपले कर्तव्य बजावले पाहिजे एवढेच.

गेल्या दोन दिवसापूर्वी रोज मोठमोठ्या अतिक्रमण विभागाचा कारवाईचा धडाका सुरू होता. या काळात विनामास्क मनपा अतिक्रमण विभागाने मंगळवारी एकाच वेळी कारवाई केली.

या कारवाईत जवळपास 55 ते 60 दुकानांवर कारवाई करीत 4 ट्रॅक्टर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच भंगार बाजारातील 16 ते 17 दुकाने, फुले मार्केट सह परिसरातील तसेच मंदिरालगतची 25 ते 30 दुकाने, मनपा इमारत गोलाणीला लागून असलेले 5 ते 6 दुकाने व गणेश कॉलनी रस्त्यावरील दुकाने, हॉकर्सचे अतिक्रमण हटविण्यात आले.

अतिक्रमण विभागाच्या ट्रॅक्टरमध्ये हा जप्त केलेला माल आणण्यात आला होता. तसेच अशीच कारवाई त्या अगोदरही वारंवार होत होती. यावरुन मनपा या विभागासह किती अ‍ॅक्टीव्ह मोडवर आले आहे. मात्र शनिवारी वेगळीच परिस्थीती असते असे वारंवार निदर्शनास येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या