Wednesday, April 24, 2024
Homeजळगावखरेदी दरात वाढ झाल्याने दूध उत्पादकांना दिलासा

खरेदी दरात वाढ झाल्याने दूध उत्पादकांना दिलासा

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जगभरात सुरु असलेल्या कोविड-19 या संसर्ग रोगामुळे सर्वांना आर्थिक संकटास सामोरे जावे लागत आहे. या समस्येतून जळगाव दूध संघही सुटलेला नाही.

या निर्णयापोटी संघाला एक महिन्यास रक्कम रुपये 1 कोटी 25 लाख अधिक खर्च होईल. संघाने सणाचा काळ लक्षात घेता ग्राहकांसाठी विक्री दरात कुठलीही वाढ केलेली नाही व पशुखाद्याच्या दरात ही कोणतीही वाढ नसल्याचे चेअरमन यांनी सांगितले.

- Advertisement -

अशा परिस्थितीत एकीकडे दूध विक्रीत घट आलेली आहे व दुसरीकडे पावडर व बटर ह्यांचे दरही अपेक्षेप्रमाणे नाही. संघाकडे अजुनही दूध अतिरीक्त आहे.

परंतु असे असतांना ही दूध संघाच्या संचालक मंडळाच्या दि.29 ऑगस्ट रोजीच्या मासिक सभेत म्हशीच्या दुधाचे दर तीन रुपयाची ही अधिक वाढ प्रतिलिटर प्रमाणे व गायीच्या दुधाचे दर 1.20 प्रतिलिटर प्रमाणे दि. 1 सप्टेंबरपासून वाढ करण्यात आलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या