Wednesday, April 24, 2024
Homeजळगावगावठी कट्टा, चॉपर घेवून दहशत माजविणार्‍या दोघांना अटक

गावठी कट्टा, चॉपर घेवून दहशत माजविणार्‍या दोघांना अटक

जळगाव – jalgaon

यावल तालुक्यातील अकलूद येथे गावठी कट्टा व चॉपर घेवून दहशत माजविणार्‍या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी मुसक्सा आवळल्या आहेत. सचिन उर्फ दादू हरिष चौधरी वय १९ रा. रा. तापी नगर भुसावळ व धीरज केशवसिंग जाधव वय २६ रा. मोरेश्‍वर नगर, भुसावळ अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

- Advertisement -

पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, लक्ष्मण पाटील, श्रीकृष्ण देशमुख , रणजीत जाधव, किशोर राठोड, विनोद पाटील, ईश्‍वर पाटील, यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दोघा संशयितांकडून गावठी कट्टा व चॉपर हस्तगत करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी दोघांना फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या