Thursday, April 25, 2024
Homeजळगावकांचननगरातील तरुणीची गळफास घेवून आत्महत्या

कांचननगरातील तरुणीची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

कांचननगरातील तरुणीने रविवारी सकाळी साडेसात वाजेपूर्वी राहत्या घरात..

- Advertisement -

गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

कांचननगरातील कालिंका माता मंदिराजवळील तेजश्री राजेंद्र चौधरी (वय २३) या तरुणीने राहत्या घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला.

या घटनेबाबत कळताच तेजश्रीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, तिचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले.

याबाबत कळताच शनिपेठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी राहुल घेटे आणि राहुल पाटील घटनास्थळी पोहचले. शवविच्छेदन झाल्यानंतर तरुणीचा मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हेड कॉन्स्टेबल रवींद्र पाटील करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या