Wednesday, May 8, 2024
Homeजळगावगुडघे दुखीच्या त्रासाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

गुडघे दुखीच्या त्रासाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

हरिविठ्ठलनगरातील ७५ वर्षीय वृद्धाने गुडघे दुखीच्या त्रासाला कंटाळून रविवारी सकाळी…

- Advertisement -

साडेसात वाजेपूर्वी राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली.

हरिविठ्ठलनगरामधील शंकर वामन सूर्यवंशी हे काही वर्षांपासून गुडघे दुखीच्या त्रासाने त्रस्त झाले होते. अनेक प्रकारचे औषधोपचार करुन देखील त्रास कमी होत नव्हता.

घराच्या खालच्या मजल्यावर त्यांचा मुलगा ज्ञानेश्‍वर सूर्यवंशी राहतो. तर शंकर सूर्यवंशी हे वरच्या मजल्यावर एकटेच राहत होते.

मुलगा वडिलांना नेहमी प्रमाणे सकाळी चहा, नास्ता देण्यासाठी त्यांच्या खोलीत गेला. परंतु, शंकर सूर्यवंशी यांनी गळफास घेतल्याचे उघडकीस आले.

त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या