Thursday, April 25, 2024
Homeराजकीयनाथाभाऊंचे अखेर ठरले...

नाथाभाऊंचे अखेर ठरले…

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू झालेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे

- Advertisement -

राष्ट्रवादी प्रवेशाचे अखेर निश्‍चित झाले असून, गुरुवारी शरद पवारांच्या उपस्थितीत माजी मंत्री एकनाथराव खडसे त्यांच्या कन्या तथा जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करुन भाजपाला कायमचा रामराम ठोकणार आहे.

त्यादृष्टीने खडसे समर्थकांकडून जोरदार हालचालींना जोर आला असून, खडसे मोजक्या कार्यकर्त्यांसह आज बुधवार दि. २१ रोजी मुंबईकडे रवाना होणार आहे.

माजी मंत्री तथा खान्देशातील भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे हे गुरुवारी २२ ऑक्टोबर रोजी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अधिकृतपणे कन्या तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन रोहिणीताईंसह प्रवेश करणार आहेत अशी माहिती अशी माहिती सुत्रांकडून पुढे आली आहे.

याबाबतची खात्रीशिर माहिती स्वतः खडसे व रोहिणी खडसे देत नसले तरीही, खडसे यांनी मात्र काही गोष्टी मलाही माहिती नसतात असे सूचक वक्तव्य केले आहे.

मुंबईला बुधवारी जाणार असल्याच्या वृत्ताला खडसेंनी नकार दिला असला तरीही कार्यकर्ते जळगावातून मुंबई येथे रवाना होणार असल्याचे सांगत आहेत. खडसेंच्या पक्षांतरामुळे भाजपाला जिल्ह्यात ७० टक्के खिंडार पडणार असून खान्देशात भाजप खिळखिळी होण्याची चिन्हे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या