Friday, April 26, 2024
Homeजळगावडॉक्टर म्हणतात, आम्हीच बरोबर

डॉक्टर म्हणतात, आम्हीच बरोबर

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यातील खासगी कोविड सेंटर चालकांकडून उपचार घेणार्‍या रुग्णांकडून अतिरीक्त शुल्क वसुल केल्याप्रकरणी

- Advertisement -

1 कोटी 11 लाख 60 हजार 500 रुपयांची तफावत लेखा परिक्षणात आढळुन आल्यानंतर जिल्ह्यातील चाळीस खासगी डॉक्टरांना वसुलीच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.

दरम्यान यावर डॉक्टरांचा खुलासा घेण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात बैठकीत कोविड सेंटर चालक डॉक्टरांनी आम्ही वसुल केलेेले शुल्क बरोबर असून लेखा परिक्षकांचे गैरसमज झाल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर तफावत आढळली आहे.

असा सुर आवळल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील चाळीस कोविड सेंटरच्या पुर्नपरिक्षणाचे आदेश लेखा परिक्षकांना दिले आहे.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे, आयएमएचे डॉ. विलास भोळे व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित डॉक्टरांनी लेखा परिक्षणाबाबत नाराजी व्यक्त करीत त्यांच्या शंका उपस्थित करुन. जवळ-जवळ सर्वच डॉक्टरांनी रुग्णांच्या विम्याच्या पैशांमुळे वसुली केलेल्या आकडेवारीत मोठी तफावत असल्याचे सांगितले.

जळगाव जिल्ह्यात खासगी रुग्णालयाकडून रुगणांची लूट होत असल्याबाबत काही दिवसांपासून तक्रारी सुरू होत्या या पार्श्वभूमीवर शासनाकडून जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी नेमण्यात आली होती .

या कमिटीने जळगाव जिल्ह्यातील खासगी रुग्णालयाचे लेखापरीक्षण करून वस्तुस्थिती जाणून घेतली असता जिल्ह्यातील 40 खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या 831 रुग्णाकडून वसूल करण्यात आलेल्या रक्कमेत तफावत आढळून आली .

जिल्ह्यातील 40 खासगी रुग्णालयानी 831 रुग्णाकडून 1 कोटी 11 लाख 60 हजार 500 रुपये अतिरिक्त वसूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे .शासन नियमाप्रमाणे 831 रुग्णाकडून 6 कोटी 22 लाख 1640 रुपये रक्कम होत असताना खासगी रुग्णालयानी रुग्णाकडून 7 कोटी 33 लाख 62 हजार 146 रुपये इतकी रक्कम वसूल केली आहे .

शासन नियमाप्रमाणे 6 कोटी 22 लाख 1640 रुपये ही रक्कम असताना खासगी रुग्णालयानी 1 कोटी 11 लाख 60 हजार 500 इतकी जादा रक्कम वसूल करण्यात आली आहे .

ही जादा रक्कम वसूल करणार्‍या खासगी हॉस्पिट ल मध्ये जळगाव शहर आणि परिसरातील खासगी हॉस्पिटल मधून 1 कोटी लाख इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे . याप्रकरणी डॉक्टरांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या