जळगाव : विभागीय टेबल टेनिस स्पर्धेला प्रारंभ

jalgaon-digital
2 Min Read

जळगाव – jalgaon

जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आयोजित नाशिक विभागीय टेबल टेनिस स्पर्धेला शनिवारी प्रारंभ झाला. जळगावच्या जिल्हा क्रीडा संघात सुरू झालेल्या ह्या स्पर्धेत १३० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.प्रारंभी आमदार राजुमामा भोळे व जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी टेबल टेनिस खेळून स्पर्धेचे उद्घाटन केले.यावेळी जिल्हा असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर त्रिपाठी,मनोज अडवाणी, कार्याध्यक्ष प्रकाश चौबे, कोषाध्यक्ष संजय शहा,सचिव विवेक आळवणी, सहसचिव सुनील महाजन, राजु खेडकर कन्हैयालाल संतानी (क्रीष्णा लॅम), हेमंत कोठारी (एस.के.ट्रान्सलाइन), राहुल पवार (डॉक्टर बिर्याणी), हर्षद दोषी (दोषी ऑटोमोबाईल), संजय जोशी (खान्देश स्पोर्ट्स), शैलेश राणे (हॉटेल पथिका) आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत यजमान जळगाव सह नाशिक, अहमदनगर, धुळे व नंदुरबार ह्या पाच जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. विभागीय स्पर्धेत ११,१३,१५,१७ वर्ष वयोगटातील मुले व मुली तसेच पुरुष व महिला गटाचे सामने खेळविले जात आहेत. आज विविध गटात झालेल्या सामन्यांमधून ११ वर्ष वयोगटात श्लोक वारके ,जळगाव व खुश बांगडीया,धुळे यांनी अंतिम फेरी गाठली तर १३ वर्ष वयोगटात भूमीज सावदेकर,श्रीराम केसकर, आरूष जाधव सर्व जळगाव,१५ वर्षं वयोगट – अर्णव पाठक,धुळे प्रेषित पाटील, जळगाव. मुली – श्रध्दा साने, आर्या बेहेडे दोन्ही जळगाव,१७ वर्ष वयोगट – दक्ष जाधव, युग अग्रवाल व राजवीर भतवाल दोन्ही धुळे. मुली- स्वरदा वालेकर, नाशिक,मृण्मयी साळवे, धुळे, ध्रुवी बांगडीया,धुळे,मैथिली थत्ते,१९ वर्षं वयोगट- युग अग्रवाल, धुळे, ओजस येवले, जस वेद, जळगांव या खेळाडूंनी उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. रविवार दि.२४ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता सर्व गटाच्या अंतिम समन्यांना सुरुवात होईल व त्यानंतर लगेचच बक्षीस समारंभ होणार आहे.स्पर्धा यशस्वीतेसाठी ऍड. विक्रम केसकर, शैलेश जाधव,आयोजन सचिव स्वानंद साने,अमित चौधरी, पुष्कर टाटीया, जश वेद आदी परिश्रम घेत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *