Wednesday, April 24, 2024
Homeनगरजळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस निरीक्षकपदी अविनाश आदिक

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस निरीक्षकपदी अविनाश आदिक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस निरीक्षकपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांची निवड प्रदेशाध्यक्ष नामदार जयंतराव पाटील यांनी आज जाहीर केली.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्यावर या आगोदर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य प्रचार समन्वयक व सोशल मीडिया व मीडिया सेलची , तसेच मालेगाव, नांदेड, धुळे, व नंदुरबार चार जिल्ह्यांचे पदाधिकारी निवडी संदर्भात व पक्ष बांधणीसाठी प्रदेश काँग्रेसने त्यांना दिलेली जबाबदारी यशस्वी पार पाडली होती.

आता जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस निरीक्षक पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांची निवड झाली आहे.

अविनाश आदिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस असून श्रीरामपूर पालिकेचे सूत्रधार आहेत. तसेच आदिक यांच्या वेगवेगळ्या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. सध्या ते महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष, खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव, रामराव आदिक पब्लिक स्कूलचे अध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. तर नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांचे ते बंधू आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या