Friday, April 26, 2024
Homeजळगावजळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

जळगाव jalgaon

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (Jalgaon District Cooperative Milk Producers Association) संचालक मंडळाच्या (Board of Directors) निवडणुकीचा कार्यक्रम (Election program) जाहीर (Announced) झाला असून, दि. ३ नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल (Nomination letter filed) करण्याला सुरुवात होणार आहे. दूध संघासाठी दि. १० डिसेंबर रोजी मतदान (voting) होणार असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी संतोष बिडवई (Election Adjudication Officer Santosh Bidwai) यांनी दिली आहे.

- Advertisement -

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या चौकशीवरुन राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसे व भाजपाचे मंगेश चव्हाण यांच्यात घमासान सुरु आहे. तर दुसरीकडे राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाच्या मंजुरीने दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली.

असा आहे निवडणुक कार्यक्रम

नामनिर्देशन पत्र दाखल करणे दि. ३ ते १० नोव्हेंबर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत, निवडणुक कार्यालय दूध संघ, नामनिर्देशन पत्रांची छाननी- दि. ११ नोव्हेंबर, वैध नामनिर्देशन पत्र जाहीर करणे- दि. १४ नोव्हेंबर, नामनिर्देशन पत्र माघार- दि. १४ ते २८ नोव्हेंबर, अंतीम उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप- दि. २९ नोव्हेंबर, मतदान- दि. १० डिसेंबर सकाळी ८ ते ४ या वेळेत, मतमोजणी- दि. ११ डिसेंबर सकाळी ८ वाजेपासून

मतदार संघनिहाय जागा

खुला प्रवर्ग (तालुका निहाय) १५ महिला राखीव-२, इमाव-१, अ.जाती-जमाती १, विजाभज व विमाप्र-१ एकूण २०, असे मतदार संघनिहाय उमेदवार निवडुन द्यावयाचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या