Friday, April 26, 2024
Homeजळगावकैद्यांना पळून जाण्यास मदत करणारा आरोपीस अटक

कैद्यांना पळून जाण्यास मदत करणारा आरोपीस अटक

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्हा कारागृहातून पलायन केलेल्या तीन कैद्यांना दुचाकीवर बसवून पळून जाण्यास मदत करणारा जगदीश पुंडलिक पाटील (18, रा.पिंपळकोठा, ता.पारोळा)

- Advertisement -

हा पारोळा येथून रविवारी रात्री सुरतला जाणार्‍या ट्रॅव्हल्स बसमध्ये जात असताना एलसीबीच्या पथकाने धुळे रस्त्यावर बस थांबवून सिनेस्टाईल कारवाई केली. तब्बल महिन्याभर गुंगारा देणार्‍या या गुन्हेगारी चौकडीतील एकाला जेरबंद करण्यात एलसीबीच्या पथकाला यश आले आहे.

जळगाव जिल्हा कारागृहातील रक्षक पंडित दामू गुंडाळे यांच्या डोक्याला गावठी पिस्तूल लावून सुशील अशोक मगरे (वय-32, रा.कसबे पहूर, ता.जामनेर), गौरव विजय पाटील (वय-21, रा.तांबापुरा, अमळनेर) व सागर संजय पाटील (वय-22, पैलाड, अमळनेर) या तीन कैद्यांनी जिल्हा कारागृहातून फिल्मीस्टाइल पलायन केल्याची घटना गेल्या महिन्यात दि.25 जुलै रोजी घडली होती.

या तिघांना घेण्यासाठी बाहेर जगदीश पाटील हा दुचाकीवर थांबलेला होता. एकाच दुचाकीवर हे चौघे जण पळून गेले होते. या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी ही चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

नंदूरबारहून दोन गटात विभागणी

जिल्हा कारागृहातून बाहेर आल्यावर चौघ जण नंदूरबार येथे गेले. त्यानंतर तेथून सुशील मगरे व गौरव पाटील दोघं जण सोबत तर सागर पाटील व जगदीश पाटील हे दोघं जणसोबत होते.

दोन गट करुन वेगवेगळ्या दिशेने गेलो होतो. गेल्या एक महिन्यापासून पोलिसांना हुलकावणी देत फिरत होतो, अशी माहिती संशयित आरोपी जगदीश पाटील याने दिली आहे.

धुळे-साक्री रोडवर बसची नाकाबंदी

फरार आरोपी सागर पाटील व गौरव पाटील या दोघांनी देखील कारागृहातून पलायन केल्यानंतर अमळनेरात येऊन दुचाकी वाहन चोरी केल्याचे प्रकरण उघड झाले होते.

जगदीश पाटील हा रविवारी रात्री पारोळा येथून सुरतला जाण्यासाठी एका ट्रॅव्हल्स बसमध्ये बसला होता.

ही माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळाल्यानंतर धुळे-साक्री रोडवर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान बस अडवून जगदीश पाटील यास अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या