Saturday, April 27, 2024
Homeजळगावजिल्हा रुग्णालय सामान्य रुग्णांसाठी पूर्ववत

जिल्हा रुग्णालय सामान्य रुग्णांसाठी पूर्ववत

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली असून सद्यस्थितीत कोविड 19 ची दुसरी लाट ओसरलेली आहे.

- Advertisement -

त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय हे नॉन कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यास हरकत नसल्याबाबत अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी अहवाल

दिलेला आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात आता पूर्ववत होवू ओपीडी सुरु होणार आहे.

सद्यस्थितीत जिल्हा महिला शासकीय रुग्णालय, मोहाडी रोड हे रुग्णालय पुर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याने तसेच त्याठिकाणी आयसीयु सुविधा अद्याप कार्यान्वित झालेली नसल्याने आयसीयु सुविधेची गरज असणार्‍या कोरोना बाधित रुग्णांकरीता जिल्हा सामान्य रुग्णालय येथील आयसीयु सुविधा पूर्वीप्रमाणेच उपलब्ध राहील.

मोहाडी येथील जिल्हा महिला शासकीय रुग्णालयातील आयसीयु सुविधा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर सदरचे रुग्ण त्याठिकाणी स्थलांतरीत करण्यात यावेत. तसेच म्युकरमायकोसीस या आजाराचे रुग्णांवर उपचार करण्याकरीता पूर्वीप्रमाणेच जिल्हा सामन्य रुग्णालयाील आयसीयु वार्डमध्ये उपचार सुरु राहणार आहे.

मोहाडी येथील रुग्णालय तातडीने सुरु करा

जिल्हा शल्य चिकित्सकांनी मोहाडी येथील महिला शासकीय रुग्णालय पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी. या आदेशाचे उल्लंघन अथवा भंग केल्यास सदर बाब ही आपत्ती व्य्वस्थापन अधिनियम 2005 , भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, 1897 भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी आदेश दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या