Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedयावल तालुक्याला आस उद्योगधंद्यांची

यावल तालुक्याला आस उद्योगधंद्यांची

नजिकच्या कालखंडात या इमारतीमध्ये पंचायत समितीचा कारभार चालेल. महसूल प्रशासनाची तहसील कार्यालयाची इमारत काही महिन्यापूर्वीच नव्या इमारतीमध्ये हे स्थलांतरित झाली तालुक्यातील राजकारणी विकासाभिमुख राजकारण करतात असे असले तरी तात्विक मतभेद ठेवतात. मात्र वैयक्तिक मतभेद ठेवीत नाहीत. हे इतर तालुक्यांनाही माहित आहे. यावल तालुका हा महर्षी व्यास ऋषींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला तालुका. हाडकाई नदीच्या काठावर महाभारताचे काही पर्व या ठिकाणी लिहिले गेले. त्यांच्या वास्तव्यामुळे त्यांच्या पादुका या ठिकाणी पूजन करून काशी नंतर व्यासांचे स्थान एकमेव यावल येथेच आहे तर अर्ध्या महाराष्ट्राची कुलदैवत असलेली मनुदेवी माता सातपुडा निवासिनी हिचे दूर-दूर पर्यंत भक्त आहेत. ते या ठिकाणी येऊन पूजा-अर्चा करतात.

सातपुड्याच्या कुशीत वसलेला यावल तालुका केळी बागांमुळे प्रसिद्ध असलेले नाव भारताच्या नकाशावर आहे. दोनशे ते तीनशे हेक्टर जमिनीवर केळीची लागवड तालुक्यात होते. आता पारंपरिक पद्धतीने शेतकर्‍यांनी कात टाकलेली असून मशागतीमध्ये अत्याधुनिक तंत्राचा वापर करून केळी मोठ्या प्रमाणावर पिकवली जाते. मात्र शेतकर्‍यांना त्यांच्या हातामध्ये त्यांचा हक्काचा पैसा मिळत नाही आणि शेतकर्‍यांच्या पाठीशी आजपर्यंत असं कोणीही उभा राहिलेला दिसत नाही. शेतकर्‍यांच्या मालाला मातीमोल भाव मिळत असून ्व्यापार्‍यांची मात्र चांदी होत असली तरी तालुक्यातील उद्योगधंदे बंद पडल्याने चहूबाजूने शेतकरी शेतमजूर यांची कोंडी झाली असून लोकप्रतिनिधींनी उद्योगासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

- Advertisement -

यावल तालुका तसा पूर्वीपासून सुजलाम-सुफलाम होता. तो मधुकर सहकारी साखर कारखाना आणि जे.टी. महाजन सहकारी सूतगिरणीच्या माध्यमातून. त्यातच दुसखेडा पेपर मिल सुद्धा बंद पडली. कर्जाचा डोंगर, शासनाचे वेगवेगळे कायदे, दरवर्षी वाढत जाणारे विजेचे अवास्तव बिल आणि भूगर्भातील प्रामुख्याने पाण्याची खोल जाणारी पातळी ही वेगवेगळी कारणे तालुक्याला अडचणीत टाकत गेलेली दिसत आहे. उत्तर महाराष्ट्रातील एकमेव असा सुरळीत चालणारा मधुकर सहकारी साखर कारखाना कर्जाच्या खाईत सापडला. त्यातच वरिष्ठ पातळीवरील राजकारण त्याला भोवले त्यामुळेच त्याची चालणारी चाकं बंद पडली. तीच अवस्था जे.टी. महाजन सहकारी सूतगिरणीची झाली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतलेला ताबा आणि त्यात असलेले राजकारण हे यावल तालुक्यातील सुमारे तीन हजार घरांची चूल बंद पाडणारे निर्णय प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या बेजबाबदारपणामुळेच घडल्याचे जाणवते. आज यावल सूतगिरणी व मधुकर सहकारी साखर कारखाना सुरु राहिला असता तर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या चार ते पाच हजार कुटुंबियांचा जीवन मरणाचा प्रश्न उद्भवला नसता. अनेकांना आज उपासमारीची झळ पोहोचत आहे.

जे कंपनीमध्ये व कारखान्यात काम करत होते त्यांना आता कुदळ घेऊन लोकांच्या घरी रोजंदारी पहावी लागते. त्यामुळे अनेक कामगारांना अशा गोष्टींचा विट आलेला आहे. तालुक्यात प्रशासकीय इमारती उभ्या करण्याचा लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकार्‍यांचा मानस आहे. प्रशासकीय इमारतींमुळे शहराचा चेहरा-मोहरा बदलला जाणार आहे.शासनाचे तालुक्या वरील मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या पंचायत समितीची भव्य अशी वास्तू उभी राहिली जात आहे.

निंबा देवी आणि हरिपुरा धरणाचे शेवटच्या टप्प्यातील रखडलेले काम पूर्ण होणे गरजेचे आहे जर निंबा देवी पाझर तलाव आणि हरिपुरा धरणाचे गेट व सांडव्याचे काम झाल्यास याठिकाणी पर्यटन स्थळ विकासा-साठी चांगली संधी आहे. यामुळे शासनाला महसूलही मिळेल आणि यावल तालुक्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या अनेकांना रोजगार उपलब्ध होईल. मात्र यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची मानसिकता असणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी ठरवले तर निश्चित यावल तालुका हा उद्योगासाठी अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकेल यात शंका नाही.

केळी पिका वर संशोधन करून नवीन प्रोजेक्ट तयार झाले तर शेतकर्‍यांनाही भाव मिळेल व मजुरांनाही हाताला काम मिळेल आणि शेतकर्‍यांना केळी लागवड पासून तर केळीचा घड कापे पावेतो उत्पादित खर्च होतो तो भाव मिळत नाही. तो मिळाल्यास शेतकर्‍यांनाही सुगीचे दिवस येतील. व्यापारी आर्थिक लुबाडणूक शेतकर्‍यांची करीत आहेत याला पायबंद घालता येईल. अनेक शेतकर्‍यांचे केळीचे पैसे व्यापार्‍यांनी बुडविले याबाबत पोलिसात तक्रारी दिल्या तर त्या कोर्ट कचेरी मध्ये शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो, वेळ वाया जातो आणि केस आपल्याकडून लागेलच याची शाश्वती नसल्यामुळे शेतकरी अशा फंदात पडत नाही.

म्हणूनच शेतकर्‍यांची लुबाडणूक होते मात्र तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती व लोकप्रतिनिधींनी ठरविले तर अशा व्यापार्‍यांवर गुन्हे दाखल झाले तर निश्चितच त्याला पायबंद बसेल.यावल तालुक्यात आजच्या घडीला एकही उद्योग नाही. विंध्य पेपर मिल बंद पडली, सूतगिरणी, साखर कारखाना बंद पडला. भूगर्भातील पाणी पातळी खोल गेली. त्यामुळे शेती करणेही अवघड होत असून यावल रावेर तालुक्याच्या कुशीत नवीन उद्योगधंदे आणल्याशिवाय यावल तालुका वासियांना सुगीचे दिवस येणार नाहीत.

- Advertisment -

ताज्या बातम्या