Friday, April 26, 2024
Homeजळगावमालवाहतुकीत जळगाव आगार राज्यात प्रथम

मालवाहतुकीत जळगाव आगार राज्यात प्रथम

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळास मालवाहतुकीद्वारे जिल्ह्यातील विविध आगारांद्वारे अवघ्या दीड महिन्यात जवळपास 24 लाख 3 हजाराचे उत्पन्न मिळाल्याचे माहिती विभागीय वाहतूक नियंत्रक राजेंद्र देवरे, विभागीय वाहतूक अधिकारी बंजारा यांनी दिली.

- Advertisement -

कोरोनाच्या भीषण महामारीमुळे अवघे जग हादरले असून यामुळे संपूर्ण देशाला याची झळ सोसावी लागत आहे. परिणामी आर्थिक चक्र रोडावले गेले आहे यात महाराष्ट्रही अपवाद नाही. यामुळेच गेल्या चार महिन्यापासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीचे चाक जागच्या जागी थांबले असून प्रवासी वाहतुकीद्वारे कोटीच्या कोटी उत्पन्नाला जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुकले असून कधी नव्हे एवढा तोटा सोसावा लागत आहे. यामुळे परिवहन महामंडळाचे जिल्ह्यासह राज्यात मोठे नुकसान झाले आहे. यावर पर्यायी व्यवस्था म्हणून मालवाहतुकीचा नवा पर्याय 28 मे पासून महामंडळाने राज्यात सुरू केला आहे.

पहिलीच ट्रीप यवतमाळला

जळगाव शहराला पहिली ट्रीम यवतमाळ येथील मिळाली होती. रंगकामाचे साहित्य तसेच प्लास्टिकचे साहित्य घेवून ही ट्रीप जळगाव आगाराने केली होती. ते पहिले उत्पन्न मिळाले. यानंतर अधिक उत्पन्न हे मिळण्यास सुरुवात झाली आज जिल्ह्यात एक नंबर आहे. तर जिल्हा आगार राज्यात एक नंबर आले आहे.

महाराष्ट्र राज्यात 28 मे पासून मालवाहतुकीची सेवा कार्यान्वित झाली. या अंतर्गत राज्यातील 35 जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्हा आगाराने एक नंबर मिळवला आहे. राज्यात मालवाहतुकीत जळगाव जिल्हा आगाराने एक नंबर मिळवला असल्याने संपूर्ण जिल्हावासीयांच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे.

जिल्ह्यात प्रथम

जिल्ह्यात जळगाव, मुक्ताईनगर, भुसावळ, पाचोरा, एरंडोल, अमळनेर, रावेर, चोपडा, जामनेर, यावल, चाळीसगाव अशी एकूण 11 आगार आहेत.

जळगाव आगारासह जिल्ह्यातील विविध आगारांनी मालवाहतुकीत आगाराला झोकून दिले असून जळगाव आगार 3 लाख 72 हजार 706 रुपये मिळवून पहिल्या स्थानी आहे. त्या खालोखाल जामनेर, चोपडा, पाचोरा, एरंडोल, भुसावळ आगाराचा समावेश आहे.

आजअखेरचे उत्पन्न

जळगाव 3, 72, 706, यावल 87, 240, चाळीसगाव 2, 48, 860, अमळनेर 1, 19, 639, चोपडा1, 45, 340, जामनेर 2, 56, 975, रावेर 575, 497, मुक्ताईनगर 42345, पाचोरा 131935, भुसावळ 121393, एरंडोल 1, 21, 393 असे एकूण 24, 03, 193 रुपये एवढे उत्पन्न मालवाहतुकीद्वारे जिल्ह्याला मिळाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या