Friday, April 26, 2024
Homeजळगावजळगाव : जिल्ह्यात आत्तापर्यंत 2 हजार 664 रुग्णांचे कोरोना विषाणू संसर्ग...

जळगाव : जिल्ह्यात आत्तापर्यंत 2 हजार 664 रुग्णांचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी करण्यात आले स्क्रिनिंग

जळगाव –

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज 5 एप्रिल, 2020 रोजी एकूण 49 नवीन रुग्णांचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी स्क्रीनिंग करण्यात आले. त्यापैकी बारा रुग्णांचे घशातील स्त्रावाचे नमुने (स्वॅप) तपासणीसाठी घेण्यात आले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात आत्तापर्यंत 135 संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी 119 रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 12 रुग्णांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. तसेच दोन रुग्णांचे तपासणी अहवाल रद्द करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत 2 हजार 664 रुग्णांचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी स्क्रिनिंग करण्यात आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पाॅझिटिव्ह दोन रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी एका रूग्णावर महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहे. तर एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रूग्णास मधुमेह व दम्याचाही आजार होता. त्याचबरोबर दोन संशयित रूग्णांचा काल रात्री मृत्यू झाला आहे. परंतु त्यांचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याने त्यांच्या मृत्यूचे कारण निश्चित करता आलेले नाही. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ भास्कर खैरे यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या