Friday, April 26, 2024
Homeजळगावजिल्ह्यातील 25.9 टक्के नागरिकांच्या शरिरात आढळल्या अँटीबॉडीज

जिल्ह्यातील 25.9 टक्के नागरिकांच्या शरिरात आढळल्या अँटीबॉडीज

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी करावयाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील करोना संसर्गाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या सीरो सर्व्हेत

- Advertisement -

जिल्ह्यातील 25.9 टक्के नागरिकांच्या शरिरात अँटीबॉडीज आढळुन आल्या आहेत. यावरुन जिल्ह्यात 25 टक्के कोरोनाचा संसर्ग असल्याचा अनुमान काढण्यात आला आहे.

काही दिवसांपुर्वी जिल्ह्यातील कोरोना संर्गाची परिस्थिती जाणून घेण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात सीरो सर्व्हे केला होता.

या सीरो सर्व्हेचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यात जळगाव जिल्ह्यात प्रातिनिधीक स्वरुपात घेण्यात आलेल्या 405 नागरिकांच्या रक्त नमुन्यांपैकी 105 नागरिकांच्या शरिरात अँटीबॉडीज आढळुन आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात 25.9 टक्के इतका कोरोनाचा संसर्ग असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे.

राज्यात बीड, परभरणी, नांदेड, सांगली, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यात हा सीरो सर्व्हे करण्यात आला होता. दरम्यान या पाचही जिल्ह्यांमध्ये अँटीबॉडीज आढळण्याचे प्रमाण सर्वाधिक 25.9 टक्के हे जळगाव जिल्ह्यात असल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या