Saturday, April 27, 2024
Homeजळगावराजकीय डावपेचांमुळे सहकार उद्योगक्षेत्र मोडीत !

राजकीय डावपेचांमुळे सहकार उद्योगक्षेत्र मोडीत !

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्हयात गेल्या दहा ते बारा वर्षांपूर्वी निसर्ग संपन्न असलेल्या परीसरात सहकार तत्वार असलेल्या साखर कारखान्यांचे बॉयलर प्रदिपन दसर्‍याच्या मुहूर्तावर मोठया थाटात होत होते.

- Advertisement -

अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या उद्योगांच्या माध्यमातून हजारोंना रोजगार मिळत होता. परंतु स्थानीक राजकीय डावपेच, अवाढव्य व्यवस्थापन खर्च, अनियंत्रीत कर्मचारी संख्या, साखरेचे घसरलेले दर, स्थानिक बँकांकडून थकहमी न मिळणे अशा एक ना अनेक कारणांमुळे एकेकाळी भरभराटीस असलेले उद्योग सध्यस्थितीत बंद अवस्थेत आहेत.

एकूणच जिल्हयातील सहकार तत्वावरील भरभराटीस असलेले उदयोग व्यवसाय हळूहळू मोडीत निघत आहेत.

‘मधुकर’चा दसर्‍याचा मुहूर्त हुकणार

जिल्हयात सर्वप्रथम वसंत पाठोपाठ बेलगंगा त्यानंतर चोपडा साखर कारखाने बंद पडले. मधुकर साखर कारखान्याचे देखिल गत वर्षी बॉयलर धडघडले नाही.

तर यंदा थकहमी मिळाली नसल्याने ऊस पुरवठादार, कामगारांसह अन्य देणी थकली आहेत. दसर्‍याच्या मुहूर्तावर होणारे बॉयलर प्रदिपन होणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी बंद कारखान्याच्या संख्येत वाढ होत आहे.

चोपडा साखर कारखानादेखील पडला बंद

जिल्हयात गिरणा, तापी, अंजनी आदी नद्यांमुळे आजूबाजूच्या परीसरात मोठया प्रमाणावर ऊस उत्पादन होते. या सोबतच पाठोपाठ चोपडा साखर कारखाना देखिल बंद पडला. तर जामनेर साखर कारखाना अजूनही सुरूच झालेला नाही.

मुक्ताई शुगर मात्र खाजगी तत्वावर असलेल्या कारखान्याचे गाळप मध्यंतरी सुरू होते. परंतु ते देखिल यावर्षी मधुकर साखर कारखान्याप्रमाणेच बॉयलर प्रदिपन होणार की नाही हे प्रश्नचिन्ह आहे.

आर्थिक अडचणींचा डोंगर

जिल्हयातील वसंत, बेलगंगा आणि मधुकर असे तीन कारखान्यांव्दारे मोठया प्रमाणावर उसाचे गाळप करून साखरेचे उत्पादन होेते तर वसंत साखर कारखान्याची डिस्टीलरी सुरू होती.

गेल्या आठ ते दहा वर्षांपासून अवर्षण स्थिती नैसर्गीक वा आर्थिक अडचणींचे डोंगर सातत्याने दरवर्षी वाढत असल्याने ऊस पुरवठादार शेतकरी, वाहतुकदार ठेकेदार, उसतोडणी कामगाार, शासकिय देणी, वीजबिल, कारखाना साईटवरील कर्मचार्‍यांचे वेतन, पीएफ भरणा, वाढती देणी थकीत राहिल्याने सहकार क्षेत्रातील उद्योगांवर संकट कोसळले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या