Tuesday, April 23, 2024
Homeनंदुरबारविसरवाडीनजीक अपघातात जळगावच्या उद्योजकाचा मृत्यू

विसरवाडीनजीक अपघातात जळगावच्या उद्योजकाचा मृत्यू

नवापूर – Navapur – श. प्र :

तालुक्यातील विसर वाडी गावाजवळ ट्रकने कारला धडक दिल्याने जळगाव येथील

- Advertisement -

सामाजिक कार्यकर्ते नरेश लक्ष्मीनारायण खंडेलवाल यांचा मृत्यू झाला. तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत. आज सायंकाळी ६ च्यां सुमारास ही घटना घडली.

दि. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास जळगाव येथील गोसेवक व सामाजिक कार्यकर्ते नरेश लक्ष्मीनारायण खंडेलवाल हे आपले काम आटोपून सुरत येथून जळगावला परत जात असतांना तालुक्यातील विसर वाडी गावानजीक त्यांच्या कारला (एम.एच. १९ , सी.व्ही . ६३१० ) ट्रकने ( सी.जी. ०४ , एच , वाय . ७०२५ ) धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले.

यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

तर त्यांचे मित्र विजय जैन , चालक संजय व अजुन एक मित्र हे जखमी झाले .

- Advertisment -

ताज्या बातम्या