Thursday, April 25, 2024
Homeजळगावलाचप्रकरणातील प्रांताधिकार्‍यांसह दोघांना जामीन

लाचप्रकरणातील प्रांताधिकार्‍यांसह दोघांना जामीन

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

तहसीलच्या पथकाने पकडलेले वाळूचे डंपर सोडण्याकरिता सव्वा लाखाची लाच पंटरमार्फत स्वीकारल्याप्रकरणी आरोपी प्रांताधिकारी दीपमाला जयपाल चौरे (वय 36) आणि लिपिक अतुल अरुण सानप (वय 32) यांना न्यायालयात शनिवारी हजर करण्यात आले.

- Advertisement -

त्यांना आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी असे 3 दिवस दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजेरी लावण्याच्या अटीवर वैयक्तिक जातमुचलक्यावर तात्परुता जामीन मंजूर झाला आहे. तर दोघं आरोपी तपासात सहकार्य करीत नाही. ते उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचे सुत्रांनी सांगितले.

या प्रकरणातील प्रांताधिकारी चौरे आणि लिपिक सानप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अटक केली आहे. आरोपींनी या अगोदर जप्त केलेले वाहने कारवाई न करता अशाच प्रकार सोडून दिल्याचा संशय आहे. त्यांनी त्या संबंधित वाहनचालक, मालकांकडून लाच मागितली का? याबाबत माहिती घेणे गरजेचे आहे. तसेच महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे काम बाकी आहे. तर त्यांच्या स्थावर, जंगम मालमत्ता आणि बँकेतील खात्यांची माहिती घ्यायची आहे.

या कारणांसाठी दोघं आरोपींची पाच दिवसांची पोलीस कोठडी गरजेची आहे. जामीन मंजूर झाल्यास आरोपी पुरावा नष्ट करुन साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता आहे, असे तपास अधिकार्‍यांनी न्यायालयात नमूद केले. तपास अधिकारी संजोग बच्छाव यांनी दोघांना न्या.डी.ए.देशपांडे यांच्या न्यायालयात हजर केले होते. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्या.डी.ए.देशपांडे यांनी दोघं आरोपींना वैयक्तिक जातमुचलक्यावर तात्पुरता (अंतरिम) जामीन मंजूर केला. तपासकामी आवश्यकता भासल्यास 15 दिवसांमध्ये पोलीस कोठडी मागता येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, तपास कामात आरोपी सहकार्य करीत नाही. त्यामुळे पोलीस कोठडी मागितल्या जाऊ शकते, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या