Friday, April 26, 2024
Homeनाशिकमासेमारी ठेक्यासाठी जलसमाधी आंदोलन

मासेमारी ठेक्यासाठी जलसमाधी आंदोलन

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

मुंबई (Mumbai) येथील व्यापार्‍यास मासेमारीचा ठेका (Fishing contract) दिल्यामुळे गिरणा धरणावर (Girna dam) अवलंबून असलेल्या मालेगाव (Malegaon) व नांदगाव (Nandgaon) तालुक्यातील दहा ते पंधरा हजार मच्छिमार (Fisherman) बेरोजगार (Unemployed) झाल्याने त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे.

- Advertisement -

हा खाजगी ठेका (Private contract) रद्द करावा या मागणीकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या मच्छिमारांनी प्रहार पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह गिरणा धरण पात्रात जलसमाधी आंदोलन छेडले.

तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्यासह पोलीस अधिकार्‍यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत या संदर्भात संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू असून तहसील कार्यालयात स्थानिक मच्छिमार व पदाधिकार्‍यांची बैठक घेतली जाईल, असे आश्वासन दिल्याने सायंकाळी उशीरा हे जलसमाधी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गिरणा धरणावर अवलंबून असलेल्या स्थानिक मच्छिमारांवर खाजगी ठेका देण्यात आल्याने अन्याय होत आहे. मात्र याची दखल घेतली जात नसल्याने प्रहार पक्षाचे तालुकाध्यक्ष शेखर पगार, विकास खेडकर, शुभम भदाणे आदींच्या नेतृत्वाखाली मच्छिमारांनी गिरणा धरणाच्या पाण्यात जलसमाधी आंदोलन छेडले होते. आंदोलनकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत धरण परिसर दणाणून सोडला होता. यापुर्वी मच्छिमारांनी 26 ऑगस्टला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

ठेकेदार पाण्यात रसायन टाकून मासेमारी (Fishing) करतात यामुळे लहान मासे व जलचर (Fish and aquatic animals) नष्ट होत आहे. भविष्यात माशांचे प्रमाण देखील कमी झाल्यास स्थानिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येवून ठेपणार आहे. यामुळे हजारो कुटूंबीय या व्यवसायावर अवलंबून आहेत. सदर ठेकेदार परप्रांतीय असल्याने स्थानिक मच्छिमारांना मारहाण व खोटे गुन्हे दाखल करणे आदी दहशतीचा अवलंब करतो.

ठेका रद्द न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शेखर पगार (Shekhar Pagar, taluka president of Prahar Janshakti Party), विकास खेडकर, शुभम भदाणे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. या जलसमाधी आंदोलनात संजय शिवदे, बापू कोळी, सतिष भोई, अर्जुन जावळे, सोनू मोरे, दीपक भोईल, विष्णू सोनवणे, संजय भोई, शिवाजी नाईक आदींसह शेकडो मच्छिमार सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या