Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेश'या' संघटनेनं घेतली दिल्ली बॉम्बस्फोटाची जबाबदारी

‘या’ संघटनेनं घेतली दिल्ली बॉम्बस्फोटाची जबाबदारी

दिल्ली | Delhi

राजधानी दिल्लीत असलेल्या इस्रायली दूतावासाजवळ शुक्रवारी रात्री बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली होती.

- Advertisement -

दरम्यान, या बॉम्बस्फोटाची जबाबदारी जैश उल हिंद या संघटनेनं घेतली आहे. टेलिग्राम चॅटमधून ही माहिती पुढे आली असून, तपास यंत्रणांकडून त्याची पडताळण केली जात आहे.

या आधी पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली होती. पोलिसांनी परिसरातील तीन सीसीटीव्हीच्या फुटेजची पाहणी केली. त्याचबरोबर सापडलेल्या चिठ्ठीत हा तर फक्त ट्रेलर आहे, असा इशारा देण्यात आल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, बॉम्बस्फोटात अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आल्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांकडून व्यक्त करण्यात आलीय. याअगोदर, स्फोटासाठी आयईडीचा वापर करण्यात आल्यीच शक्यता प्राथमिक चौकशीनंतर व्यक्त करण्यात आली होती. स्फोटासाठी छोट्या छोट्या बॉल बेअरिंगचाही वापर करण्यात आला. तपास यंत्रणेला घटनास्थळी सॉफ्ट ड्रिंकच्या कॅनचे काही छोटे छोटे तुकडेही मिळालेत. तपास यंत्रणेला स्फोटाच्या फॉरेन्सिक रिपोर्टची प्रतिक्षा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या