Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या जीविताला धोका

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या जीविताला धोका

दिल्ली l Delhi

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Doval) हे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित डोवाल यांच्या घर आणि कार्यालय परिसरातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

- Advertisement -

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याने चौकशीत धक्कादायक माहिती दिली आहे. जैशच्या दहशतवाद्याच्या चौकशीतून, सरदार पटेल भवन आणि राजधानी दिल्लीतील अन्य महत्त्वाच्या ठिकाणांची टेहळणी केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधील हँडलरच्या सांगण्यावरुन हे सर्व केल्याचे जैशच्या दहशतवाद्याने सांगितले.

२०१६ उरी सर्जिकल स्ट्राइक त्यानंतर २०१९ मधील बालाकोट एअर स्ट्राइकपासूनच अजित डोवाल पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर आहेत. उरी आणि बालाकोट दोन्ही स्ट्राइकमध्ये डोवाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

दरम्यान, ६ फेब्रुवारीला शोपियां येथील हिदायत उल्लाह मलिक याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत ही माहिती पुढे आली आहे. मलिक याच्याविरोदात जम्मू येथे एक गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मलिक हा जैशचा फ्रंट ग्रुप लश्कर एक मुस्तफाचा प्रमुख आहे. त्याला अनंतनाग येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे शस्त्रास्त्र आणि दारुगोळयाचा साठा सापडला होता.

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मलिक याने मे २०२० मध्ये एका आत्मघातकी हल्ल्यासाठी ह्युंडाई सेट्रो पुरवली होती. त्याने हाही खुलासा केला आहे की, इरफान ठोकर, उमर मुस्ताक आणि रईस मुस्ताक यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये जम्मू कश्मीर च्या कॅश व्हॅनमधून ६० लाख रुपये पळवले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या