Thursday, April 25, 2024
Homeनगरव्हॅलेंटाईन डे-निमित्त जातीयवाद नष्ट करण्याचा संदेश

व्हॅलेंटाईन डे-निमित्त जातीयवाद नष्ट करण्याचा संदेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जागरूक नागरिक मंचातर्फे पत्रकार चौकामधील शहीद भगतसिंग उद्यानात ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त देशावर प्रेम व्यक्त करत

- Advertisement -

जातीयवाद नष्ट करू हा संदेश देण्यासाठी अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंचाचे संस्थापक अध्यक्ष सुहास मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याची स्वच्छता करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई धर्माचे प्रतिनिधित्व करणार्‍या प्रा. सुनील पंडित, हरजितसिंग वधवा, अर्षद शेख व डेव्हिड चांदेकर यांना एकाच मंचावर बोलावून त्यांच्या हाती तिरंगा देऊन गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. भारतमातेच्या जयजयकाराच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.

यावेळी मुळे म्हणाले, व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी प्रेम व्यक्त करायचेच असेल तर देशावर प्रेम व्यक्त करा. सध्या जातीयवादाच्या किडीने संपूर्ण भारतास पोखरले आहे. राजकीय पक्ष व त्यांचे पुढारी या किडीला मुद्दाम खतपाणी घालत जातीयवादचा रोग पसरवत जाती धर्मात फुट पडून राज्य करत आहे.

शहीद भगतसिंग सारख्या अनेकांनी देशावर प्रेम व्यक्त करत स्वतंत्र्य मिळवून दिले. त्यांचा आदर्श घेऊन हम सब है या संकल्पनेने देशावर प्रेम व्यक्त करून एकत्रितपणे या जातीयवादाला समूळ नष्ट करू असा संदेश देण्यात आला. यावेळी मंचच्या सदस्या सुरेखा सांगळे, शारदा होशिंग, मेहरुदा शेख, प्रा.मंगेश जोशी, अभय गुंदेचा, कैलास दळवी, भैरवनाथ खंडागळे, बाळासाहेब भुजबळ, बी.यू.कुलकर्णी, योगेश गणगले, सुनील कुलकर्णी, जय मुनोत, अमेय मुळे, प्रसाद कुकडे, राजेश सटाणकर आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या