नंदुरबारात आज जगदंबा देवी अवतार मिरवणूक

नंदुरबार। Nandurbar प्रतिनिधी

नंदनगरीत वर्षानुवर्षे सुर असलेल्या होलिकोत्सवातील (Holikotsav) जगदंबा देवी (Goddess Jagdamba) अवताराची मिरवणूक (Procession) यंदाही दि.22 मार्च रोजी काढण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गावरील होळींना प्रदक्षिणा घालून ठिकठिकाणी दर्शन सोहळा (Darshan ceremony) होईल. अशी माहिती मांगल्यम सेवा संस्थेचे अध्यक्ष सुहास जावे यांनी दिली.

नंदुरबार शहरात होलिकोत्सवानिमित्त (Holikotsav) रंगपंचमीला जगदंबा देवी (Goddess Jagdamba) अवतार मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. यावर्षी देखील दि.22 मार्च रोजी जगदंबा देवी अवतार मिरवणूक सोहळा (Procession ceremony) होईल. दि.22 रोजी सायंकाळी 6 वाजता शहरातील कै.भास्कराव जोशी यांच्या राहते घर कमानी दरवाजा येथून जगदंबा देवी मिरवणुकीला सुरूवात होईल.

ही मिरवणूक शिवाजी चौकातील होळीला प्रदक्षिणा घालून त्याठिकाणी दर्शन सोहळा (Darshan ceremony) होईल. त्यानंतर जळका बाजारातील पोष्ट गल्लीसमोर दर्शन सोहळा, जळका बाजार मुख्य चौकात दर्शन सोहळा, टिळक रोडवरील होळीला प्रदक्षिणा घालून त्याठिकणी दर्शन सोहळा सराफ बाजारातील फडके चौकात दर्शन सोहळा (Darshan ceremony) गुळवाडीजवळ दर्शन सोहळा शहरातील प्रथम मानाच्या असलेल्या बालाजीवाडयातील होळीला प्रदक्षिणा घालून बालाजी मंदिरसमोर दर्शन सोहळा, गणपती मंदिरात मध्यरात्री मिरवणुकीची सांगता होईल, असेही जावे यांनी सांगितले.