Thursday, April 25, 2024
Homeनगर‘त्या’ दातांची होणार हैदराबादच्या प्रयोगशाळेत तपासणी

‘त्या’ दातांची होणार हैदराबादच्या प्रयोगशाळेत तपासणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केलेल्या दोन हस्तीदंताची वन अधिकार्‍यांकडून तपासणी करण्यात आली होती. उपवन संरक्षक अधिकारी यांनी प्राथमिक तपासणीमध्ये हे दात खरे असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान पोलिसांना या दाताविषयी शंका निर्माण झाली आहे. सदरचे दात हे हत्तीचे आहेत की अन्य प्राण्यांचे याची तपासणी केली जाणार आहे. दोन्ही दात हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठविले जाणार असल्याची माहिती नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली.

- Advertisement -

जेऊर (ता. नगर) परिसरातून कोट्यवधी रूपयांचे दोन हस्तीदंत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केले आहेत. सहा जणांची टोळी जेरबंद केली आहे. टोळीमध्ये व्यंकटेश दुरईस्वामी, महेश काटे, महेश मरकड, सचिन पन्हाळे, निशांत पन्हाळे, संकेश नजन यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून एक फूट व दोन फूट लांबीचे दोन हस्तीदंत जप्त करण्यात आले आहेत.

तस्करीत क्षेत्रात याची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. बहुमूल्य शोभेच्या वस्तू व औषधांसाठी या हस्तीदंताचा वापर होतो. दरम्यान उपवन संरक्षण अधिकारी यांनी दोन्ही दात हत्तीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही पोलिसांकडून याची तपासणी केली जाणार आहे. यासाठी हे दोन्ही दात हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. तेथे तपासणी केल्यानंतरच हे हस्तीदंत आहेत की नाही कळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या