Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रतापसी पन्नू, अनुराग कश्यपची पुण्यात चौकशी?

तापसी पन्नू, अनुराग कश्यपची पुण्यात चौकशी?

पुणे (प्रतिनिधि) –

इन्कम टॅक्सने मुंबईत काल अनेक बॉलिवूडमधील कलाकारांच्या घरी धाडी टाकल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री तापसी

- Advertisement -

पन्नू, दिग्दर्शक- निर्माता अनुराग कश्यप आणि विकास बहलच्या घरी इनकम टॅक्स विभागाने धाड टाकली होती. दरम्यान, पुण्यातील कोरेगाव भागातील हॉटेल वेस्टिन येथे सध्या अनुराग आणि तापसी हे एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी आले असून त्यांची बुधवारी चौकशी झाल्याची चर्चा आहे. आयटी विभागाकडून ही चौकशी झाली असल्याचे बोलले जात आहे.

आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांची चौकशी केली. त्यांच्या जवळच्या कागदपत्रांची तपासणी केली. आजदेखील आयटी विभागाकडून या दोघांची चौकशी केली जात आहे. या वेळी त्यांचा क्रूदेखील त्यांच्या सोबत होता.

दरम्यान अभिनेत्री तापसी पन्नूच्या घरी आयकर विभागाची चौकशी अद्यापही सुरू आहे. आयकर विभागाला तापसीच्या घरी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. ज्याच्या आधारे तिच्या कार्यालयाची तपासणी केली जात आहे. मुंबईसह पुणे येथील २२ ठिकाणी ही कारवाई आयकर विभागाकडून केली जात आहे. या छाप्यामध्ये नेमके कोणते पुरावे हाती लागले आहेत याचा तपशील अद्याप पुढे आलेला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या