Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानारायण राणेंच्या उपस्थितीत आज आयटी हब कॉन्फरन्स

नारायण राणेंच्या उपस्थितीत आज आयटी हब कॉन्फरन्स

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने (Nashik NMC) आज (दि.1) रोजी हॉटेल गेट-वे (ताज) येथे केंद्रीय सुक्ष्म व लघु उदयोग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या प्रमुख उपस्थितीत आयटी हब कॉन्फरंन्स (IT Hub Conference) व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) यांनी दिली…

- Advertisement -

स्वत:च्या अखत्यारीत आयटी पार्क (IT Park) साकार करणारी नाशिक महानगरपालिका (Nashik NMC) ही भारतातील पहिली व एकमेव महानगरपालिका आहे. नाशिक महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये या सर्व प्रकल्पांमुळे भरघोस निधी (Fund) उपलब्ध होऊन भविष्यात नाशिकच्या विकासाची पायाभरणी या निर्णयामुळे होणार आहे.

आयटी हब बाबतचा हा ऐतिहासिक निर्णय ठरेल. तसेच यामुळे उत्तर महाराष्ट्रासाठी (maharashtra) रोजगार निर्मितीची सुवर्णसंधी निर्माण होत आहे. या कॉनक्लेवसाठी नाशिकच्या निता असोसिएनचे पदाधिकारी व नाशिकमधील 175 पेक्षा जास्त कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

आयटी कॉनक्लेव 2022 साठी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar), खा. हेमंत गोडसे (Hemant Godse), गिरीश महाजन, जयकुमार रावल, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, आ. सरोज अहिरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, उपमहापौर भिकुबाई बागुल, स्थायी समिती सभापती गणेश गिते, सभागृह नेता कमलेश बोडके, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, भाजप गटनेता अरुण पवार, शिवसेना गटनेता विलास शिंदे, राष्ट्रवादी गटनेता गजानन शेलार, काँंग्रेस गटनेता शाहू खैरे, मनसेना गटनेता नंदिनी बोडके, रिपाई गटनेता दीक्षा लोंढे आदी उपस्थित राहाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या