Thursday, April 25, 2024
Homeनगरइस्त्रायलच्या शेतीत गुंतवणूकीचे आमिषाने तरूणीची फसवणूक

इस्त्रायलच्या शेतीत गुंतवणूकीचे आमिषाने तरूणीची फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तरूणीसोबत विवाह स्थळासंदर्भात बोलणी करून इस्त्रायल देशात शेती करणार्‍या कंपनीत गुंतवणूकीचे आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडलेल्या तरूणीची 41 हजार 500 रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. नगर शहरातील सावेडी उपनगरात राहणार्‍या तरूणीने येथील सायबर पोलीस ठाण्यात सोमवारी, 5 सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे.दिलेल्या फिर्यादीवरून लखीराम नंदलाल शिवणकर ऊर्फ लुक शिवणकर (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) याच्याविरूध्द भादंवि कलम 419, 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (डि) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

19 फेब्रुवारी, 2022 ते 8 ऑगस्ट, 2022 दरम्यान ही घटना घडली आहे. विवाह स्थळासंदर्भातील एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये फिर्यादी यांनी त्यांचा बायोडाटा टाकला होता. या बायोडाटावरील नंबरवर लखीरामने संपर्क केला. फिर्यादी व लखीराम यांच्यात मैत्री झाली. लखीरामने फिर्यादीला लग्न करण्याचे आमिष दाखवून विश्‍वास संपादन केला. लखीरामने फिर्यादीला इस्त्रायल देशात शेती करणार्‍या कंपनीत गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळण्याचे आमिष दाखविले.

या आमिषाला फिर्यादी बळी पडून त्यांनी वेळोवेळी एकुण 41 हजार 500 रूपये लखीरामच्या खात्यात पाठविले. दरम्यान फिर्यादी यांनी लखीरामसोबत संपर्क साधण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला असता त्याने मोबाईल नंबर बंद केला. फिर्यादीला फसवणूक झाल्याचे लक्ष्यात आल्याने त्यांनी आता सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या