Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिकच्या ओझर विमानतळावर विलगीकरण केंद्र

नाशिकच्या ओझर विमानतळावर विलगीकरण केंद्र

Isolation Center at Nashik’s Ozar Airport

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

करोनाचा (Corona ) प्रादुर्भाव वाढू लागला असल्याने राज्य शासनाने महत्त्वाच्या विमानतळांवर मास्क लावणे आवश्यक केले असून सुरक्षिततेच्या उपाययोजनांना ही प्रारंभ केला आहे.

त्याच पार्श्वभूमीवर नाशिक विमानतळावर (Nashik Airport )मास्क लावण्याची बंधन केले नसले तरी ही आयसोलेशन सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. नाशिक विमानतळावरून सद्यस्थितीत हैदराबाद व दिल्लीसाठी विमानसेवा सुरू आहे. या दोन्ही शहरांंमधून पर्यटकांची संख्या ही मोठी आहे. इतर विमान कंपन्यांच्या विमानसेवा अद्याप सुरू झालेले नाहीत.

या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने विविध विमानतळांवर सुरक्षिततेच्या उपाययोजना लागू करण्यास प्रारंभ केला असून त्या अंतर्गतच नाशिकच्या ओझर विमानतळावर आयसोलेशन कक्ष (Isolation Center ) उभारणीचे काम गतिमान झाले असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी आपल्यासह शहरवासीयांचा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन करण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या