Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशपाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा; तोशखाना प्रकरणी जामीन मंजूर

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा; तोशखाना प्रकरणी जामीन मंजूर

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरिक ए इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने तोशखाना प्रकरणी शिक्षेस स्थगिती देत जामीन मंजूर केला आहे. यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे…

- Advertisement -

पाकिस्तानमधील जिल्हा सत्र न्यायालयाने इम्रान खान यांना तोशखाना प्रकरणात ५ ऑगस्ट रोजी ३ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांना लाहोरमधल्या जमान पार्क येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून इम्रान खान अटकेत आहेत. न्यायालयाने इम्रान खान यांना १ लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावला होता, तसेच त्यांच्यावर ५ वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

चीनी ड्रॅगनची नवी चाल; अरुणाचल प्रदेशवर केला दावा

इम्रान खान यांच्या वकिलांनी न्यायालयाला विनंती केली आहे की, तुरुंगातून बाहेर पडल्यावर इम्रान खान यांना दुसऱ्या कुठल्या प्रकरणात पुन्हा कैद केले जाऊ नये. मात्र खान यांच्याविरोधात अनेक खटले प्रलंबित आहेत, ज्यापैकी दोन प्रकरणे अशी आहेत की, ज्यात तपास यंत्रणा इम्रान खान यांना कुठल्याही क्षणी अटक करू शकतात.

Maharashtra Government : राज्यातील दुष्काळ नियंत्रणासाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

काय आहे प्रकरण?

पाकिस्तानमध्ये तोशखाना विभागाची १९७४ साली स्थापना झालेली आहे. लोकप्रतिनिधींना मिळालेल्या भेटवस्तू नियमाप्रमाणे या विभागात जमा करत माहिती देणे बंधनकारक असते. परंतु, २०१८ साली सत्तेवर आल्यानंतर इम्रान खान यांनी त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती तोशखाना विभागाला देण्यास नकार दिला.

माहिती दिल्यास अन्य देशांशी असलेल्या संबंधावर परिणाम होईल, असा दावा इम्रान खान यांनी केला होता. त्यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तान निवडणूक आयोगाला पत्र लिहून मिळालेल्या भेटवस्तूंपैकी साधारण ४ भेटवस्तूंची विक्री केल्याचे कबूल केले होते. विक्री केलेल्या भेटवस्तूंची तोशखाना विभागाला उचित किंमत दिल्याचाही दावा इम्रान खान यांनी केला होता.

सीबीआयची मोठी कारवाई; पाच कोटींची लाच घेतल्याप्रकरणी सहाय्यक संचालकाला सीबीआयकडून अटक

- Advertisment -

ताज्या बातम्या