Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशISIS शी संबंधित दहशतवाद्याला अटक

ISIS शी संबंधित दहशतवाद्याला अटक

दिल्ली | Delhi

दिल्लीतील बुद्ध जयंती पार्क (budha jayanti park delhi) परिसरातून आयसीसशी (ISIS) संबंधित असलेल्या दहशतवाद्याला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

- Advertisement -

दिल्ली पोलिसांनी (delhi police) अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव मोहम्मद युसूफ असल्याची माहिती समोर येत आहे. गणेशोत्सवाच्या (ganapati festival) पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई करुन आयसीसच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. या दहशतवाद्याकडून पोलिसांनी एक पिस्तूलासह आयईडी (IED) आणि इतरही स्फोटक साठाही जप्त केला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांचे विशेष पथक तपास करत असून हा दहशतवादी दिल्लीत कसा पोहोचला आणि त्याला मदत करणारे लोक कोण आहेत याची माहिती घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या