Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedमधुमेह पूर्ण बरा होणारा आजार आहे का?

मधुमेह पूर्ण बरा होणारा आजार आहे का?

मधुमेह म्हणजे डायबिटीस हा पूर्ण बरा होत नाही पण जीवनशैलीत योग्य बदल केल्यास तो कंट्रोल मध्ये राहतो. प्राथमिक अवस्थेतील मधुमेह बैठ्या जीवनशैलीतून, तणाव व आहारातून चालू होतो. जर वेळीच तुम्ही योग्य आहार चालू केला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शाररिक हालचाली वाढवून शरीरातील साखर

उर्जेसाठी जाळणे चालू केले तर इन्सुलिन बनवणार्‍या स्वादुपिंडातल्या पेशींवरचा ताण कमी होतो.

- Advertisement -

तसेच तणाव, चिंतेमुळे इन्सुलिन विरोधी रसायने रक्तात येणे वाढते त्यामुळे तणाव, चिंता कमी करणे गरजेचे आहे. रेषायुक्त भाजीपाला, प्रथिने युक्त आहार वाढवणे व पिष्टमय पदार्थ कमी करणे याने मधुमेह कंट्रोल मध्ये राहतो.

मधुमेह दोन पद्धतीने नियंत्रणात ठेवता येतो.

एक म्हणजे इन्सुलिन इंजेक्शनद्वारे मधुमेहात कंट्रोल केला जातो. दुसरी पद्धत म्हणजे मधुमेह गोळ्या व आहारविहार जीवनशैलीतील बदल करून कंट्रोल होतो.

प्राथमिक अवस्थेतील डायबिटीस आहार, विहार जीवनशैलीत बदल करून नाहीसा होतो पण जर तुम्ही परत बैठी जीवनशैली चालू केली तर डायबिटीस परत येऊ शकतो.

क्वोरा (Quora) या प्रश्‍न-उत्तरांच्या एका संकेतस्थळावर एका प्रश्‍नाला उत्तर देताना समीर मोटे यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या