Friday, April 26, 2024
Homeनाशिकविकासाकामांतील अनियमितता उघड

विकासाकामांतील अनियमितता उघड

पेठ । प्रतिनिधी Peth

केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवारांच्या (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) पेठ (peth) येथील तहसिल आवारात घेतलेल्या तालुक्यातील विकास कामांचा आढावा (Review of development works), त्यावरील प्राप्त निधीचे (fund) विवरण व सध्यस्थितीची चाचपणी करण्यासाठीच्या

- Advertisement -

आढावा बैठकीत खासदारकीचा करारीपणा व जनतेच्या कामा विषयीची आस्था व जवळपास प्रत्येक विभागातील प्रशासनातील अधिकार्‍यांची उडालेली त्रेधातिरीपीटीने डॉ. पवारांची प्रशासनावर पकड घट्ट होत असल्याचा करारीपणामुळे पुढील आढावा बैठकीत येतांना विभाग प्रमुखांना गाफीलपणा अडचणीचा ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत जाणवले.

तहसिल कार्यालय (tehsil office) प्रांगणात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, प्रांतधिकारी संदीप आहेर, तहसिलदार संदीप भोसले, जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावीत, पंचायत समिती सभापती विलास अलबाड यांच्या उपस्थितीत आढावा बैठक सुरु करण्यात आली. त्यामध्ये आरोग्य विभागावर (Department of Health) प्रामुख्याने तालुक्यातील कोविड लसीकरण (vaccination) पूर्णपणे करण्याच्या सुचना तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना देण्यात आल्या.

पहिल्या डोसचे काम ठिक असतांना दुसर्‍या डोस संदर्भातील कामाबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करुन कामाचा वेग वाढविण्याच्या सुचना केल्या. ग्रामीण रुग्णालयाचा आढावा घेतांना बालकासाठी 20 बेड आरक्षीत करतांना तालुक्यातील जवळपास 1 लाख लोकसंख्येसाठी एकही आयसीयु युनीट (ICU unit) उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्याबाबत तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे व तातडीची बाब म्हणुन केंद्रीय समिती कडे पाठविण्याच्या स्पष्ट सुचना ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ. नाईक यांना देण्यात आल्या.तालुक्यातील संवेदनशिल बाब म्हणजे रस्ते.

रस्त्याच्या अनियमिततेबाबत उपअभियंता भंडागे यांची प्रचंड भंबेरी उडाली. सन 2015-16, 2016-17 कालावधीत रस्ते अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले तर अनेक रस्ते व इतर कामांची अपूर्ण माहितीचे प्रस्ताव सादर करण्यात आलेले असल्याने निधीच प्राप्त होण्यास अडचणी निर्माण झालेल्या असल्याने खा. पवारांनी अत्यंत कडक शब्दात कानउघडणी केली.

खासदार पवारांच्या आढावा बैठककीत प्रशासनाने मानसिकता बदलवण्याचे संकेत दिसुन आले. शिक्षण विभाग, लघु पाटबंधारे विभाग, बचत गट, एकात्मीक बाल विकास प्रकल्प विभाग, अदिवासी विकास, विज वितरण, कृषी विभाग, वनविभाग आदी बाबतचा आढावाही घेण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संजय वाघ, शहराध्यक्ष त्र्यंबक कामडी, रघुनाथ चौधरी, छगन चारोस्कर, हेमंत कोरे, रामदास वाघेरे, सुधाकर राऊत, दिलीप पाटील, अंबादास सातपूते आदींसह बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या