Friday, April 26, 2024
Homeक्रीडाT20 World Cup : आयर्लंडने बलाढ्य इंग्लंडला दिली मात, डकवर्थ-लुईस नियमानुसार सामना...

T20 World Cup : आयर्लंडने बलाढ्य इंग्लंडला दिली मात, डकवर्थ-लुईस नियमानुसार सामना ५ धावांनी गमावला

दिल्ली | Delhi

20 विश्वचषक 2022च्या स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. बुधवारी (26 ऑक्टोबर)इंग्लंड विरुद्ध आयर्लंड यांच्यात सुपर 12चा विसावा सामना खेळला गेला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत आयर्लंडला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले.

- Advertisement -

कॉलेजमधील प्रेम प्रकरण, बंगळूरूमध्ये लग्नगाठ; ब्रिटनचे PM ऋषी सुनक यांची फिल्मी लव्हस्टोरी वाचाच

आयर्लंडने कर्णधार अँड्र्यू बालबर्नी याच्या अर्धशतकाच्या जोरावर 19.2 षटकांत सर्व विकेट्स गमावत 157 धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने 14.3 षटकात 5 विकेट्स गमावत 105 धावा केल्या, मात्र पावसामुळे त्यांना हा सामना डकवर्थ लुईसच्या नियमानुसार अवघ्या 5 धावांनी गमवावा लागला.

- Advertisment -

ताज्या बातम्या