Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशबगदादमध्ये आत्मघातकी अतिरेकी हल्ला, २८ जणांचा मृत्यू

बगदादमध्ये आत्मघातकी अतिरेकी हल्ला, २८ जणांचा मृत्यू

दिल्ली | Delhi

इराकची राजधानी बगदाद येथे आज (गुरुवारी) आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्यात २८ जणांचा मृत्यु झाला असून अनेक जण जखमी झाले आहे.

- Advertisement -

जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती ही अत्यंत गंभीर आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी दोन हल्ले करण्यात आले आहेत. सेंट्रल बगदादच्या कमर्शियल सेंटरमध्ये हे दोन स्फोट झाले आहेत. हे आत्मघातकी हल्ले असल्याची माहिती मिळत आहे. हा स्फोट इतका मोठा होता की याचा आवाज हा तायारान स्वायरपर्यंत ऐकू आला. लोकांची जास्त गर्दी असलेल्या भागात हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारलेली नाही.

गुरुवारी झालेला हा हल्ला इराकमध्ये वर्ष २०१८ मध्ये झालेल्या हल्ल्यानंतरचा भीषण हल्ला आहे. त्यावेळीही टायेरान स्क्वेअरमध्ये हल्ला झाला होता. त्यावेळी ३० जणांचा मृत्यू झाला होता. इराकमध्ये येत्या काही महिन्यात संसदीय निवडणुका पार पडणार आहेत. त्याआधीच हा आत्मघाती हल्ला झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या