Wednesday, April 24, 2024
Homeधुळेदोंडाईचा पोलीस ठाण्यात आयपीएस कुमावत रुजू

दोंडाईचा पोलीस ठाण्यात आयपीएस कुमावत रुजू

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

मोहन मराठे संशयीत मृत्यू प्रकरणाने पुन्हा चर्चेत आलेल्या दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सुत्रे तीन महिन्यांसाठी आयपीएस पंकज कुमावत यांच्या हाती सोपविण्यात आली आहे.

- Advertisement -

ते परिविक्षा कालावधीत पुर्ण करीत असून याठिकाणी 15 दिवसांपूर्वीच नियुक्त केलेले निरिक्षक आनंद कोकरे यांना नियंत्रण कक्षात बसविण्यात आले आहे.

आयपीएस कुमावत हे मागील वर्षी उत्तीर्ण झाले असून त्यांचा सध्या परिविक्षा कालावधी सुरु आहे. या कालावधीत एका पोलीस ठाण्याची जबाबदारी स्विकारावी लागते.

या अनुशंगाने त्यांना दोंडाईचा पोलीस ठाण्याची सुत्रे देण्यात आली आहेत. यापुर्वी दोंडाईचात घडलेले योगेश धनगर प्रकरण, वाढती गुन्हेगारी आणि आता नुकतेच राज्यभर चर्चेत आलेले मोहन मराठे संशयीत मृत्यू प्रकरण यामुळे थेट आयपीएस अधिकार्‍यांच्या नियुक्तीमुळे लक्ष वेधले गेले आहे.

अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यात येवून प्रलंबित प्रकरणांवरही आपला भर राहील, असे श्री.कुमावत यांनी दै.देशदूतला सांगितले.

दोंडाईचा पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक पंजाबराव देशमुख यांच्या कारकीर्दीत मोहन मराठे प्रकरण घडल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

त्याजागी निरिक्षक आनंद कोकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र अवघ्या 15 दिवसात श्री.कोकरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या