Friday, April 26, 2024
Homeनगरआयपीएलच्या अंतिम सामन्यावर नेवासाफाटा येथे मटका

आयपीएलच्या अंतिम सामन्यावर नेवासाफाटा येथे मटका

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासाफाटा येथे रस्त्याच्या कडेला कार उभी करून मंगळवारी आयपीएलच्या मुंबई विरुद्ध दिल्ली अंतिम सामन्यासाठी

- Advertisement -

लोकांकडून पैसे घेऊन आकडे लावणार्‍या तालुक्यातील रामडोह येथील दोघांना नेवासा पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले असून त्यांच्यासह ज्यांच्या सांगण्यावरून हे आकडे घेतले जात होते त्या घोडेगाव येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल रवी गोविंद पवार यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 10 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास मुकिंदपूर शिवारात नेवासा फाटा येथे अहमदनगर येथे औरंगाबाद हायवेच्या कडेला हॉटेल गुरुदत्त समोर ह्युंडाई क्रेटा कारमध्ये (एमएच 17 सीएम 21) आयपीएलचा मुंबई-दिल्ली असा अंतिम सामना असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यातील आरोपी ज्ञानेश्वर पंढरीनाथ बोरुडे व संतोष रंगनाथ गुंजाळ दोघेही रा. रामडोह ता. नेवासा हे स्वतःच्या फायद्याकरिता लोकांकडून पैसे घेवून रजिस्टरमध्ये तसेच मोबाईल फोनवरून आकडे असलेले अंक घेऊन पैशावर हार-जीतीचा आयपीएल टी-20 अशा अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर सदर जुगारचे अंक व आकडे असलेले रजिस्टर व पैसे असे बुकी किरण पोपट जाधव रा. घोडेगाव ता. नेवासा याच्या सांगण्यावरून व प्रोत्साहन दिल्याने जुगार खेळताना व खेळविताना 12 लाखाची कार तसेच 5 महागडे अ‍ॅण्ड्राईड मोबाईल, 34 हजार 500 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 12 लाख 72 हजार 700 रुपयांच्या जुगाराच्या साहित्यासह व वाहनासह मिळून आल्याने त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 107, मुंबई जुगार कायदा कलम 4 व 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार बाळकृष्ण ठोंबरे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या