Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाIPL 2023 Schedule : आयपीएलचे बिगुल वाजणार, आज होणार वेळापत्रक जाहीर

IPL 2023 Schedule : आयपीएलचे बिगुल वाजणार, आज होणार वेळापत्रक जाहीर

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धेच्या सोळावा हंगाम सुरु होण्याची सर्व आयपीएल चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. आयपीएल कधी सुरु होणार? असा प्रश्न पडलेल्या आयपीएल चाहत्यांना आयपीएल २०२३ चे वेळापत्रक कधी जाहीर होणार? अशी घाई लागलेल्या आयपीएलप्रेमींसाठी आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे…

- Advertisement -

आयपीएल २०२३ चे वेळापत्रक आज सायंकाळी ५ वाजता जाहीर केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात १० संघ विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडणार आहेत. स्पर्धेत एकूण ७४ सामने होणार आहेत. प्रत्येक संघांची २ गटात विभागणी करण्यात येणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्व सामने होम अवे फॉरमॅटमध्ये होणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

ऑक्सिजन सिलिंडर लावून प्रचारात सहभागी झालेले गिरीश बापट रुग्णालयात दाखल

आयपीएल स्पर्धेच्या वेळापत्रकाबद्दल आयपीएल चाहते खूप उत्साही आहेत. यंदाचा आयपीएल हंगाम ७४ दिवसांचा नसून केवळ ५८ दिवसांचा असणार आहे. आयसीसी डब्लूटीसी स्पर्धेचा अंतिम सामना ८-१२ जून दररम्यान खेळविण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल छोटी असणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

Maharashtra Political Crisis : ठाकरे गटाची ‘ती’ मागणी न्यायालयाने फेटाळली, पुढील सुनावणी ‘या’ तारखेला

- Advertisment -

ताज्या बातम्या