Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाIPL-2022 : आंद्रे रसेलच्या स्फोटक फलंदाजीने कोलकाता विजयी

IPL-2022 : आंद्रे रसेलच्या स्फोटक फलंदाजीने कोलकाता विजयी

मुंबई । वृत्तसंस्था Mumbai

आयपीएलच्या ( IPL-2022 ) पंधराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने ( Kolkata Knight Riders ) पंजाब किंग्जवर ( Punjab Kings )एकहाती विजय प्राप्त केला. अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल हा कोलकाताच्या विजयाचा शिल्पकार बनला. त्याने 31 चेंडूत 70 धावा फटकावल्या. 50 धावा तर अवघ्या 26 चेंडूत फटकाविल्या. त्याने पंजाबच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले.पंजाबने दिलेले 138 धावांचे सोपे आव्हान कोलकाताने 6 गडी राखून पुर्ण केले.

- Advertisement -

प्रथम फंलंदाजी करताना पंजाबच्या फलंदाजांची अक्षरश: तारांबळ उडाली. कोलकाताच्या उमेश यादवच्या भेदक मार्‍यापुढे पंजाबचा डाव 137 धावांतच आटोपला. कगिसो रबाडाच्या 25 आणि भानुका राजपक्षेच्या 31 धावांमुळे पंजाबने कसाबसा 130चा टप्पा ओलांडला. उमेश यादवने अप्रतिम गोलंदाजी करत 23 धावांत 4 बळी टिपले.

कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल स्वस्तात माघारी परतला. भानुका राजपक्षेने फटकेबाजीची सुरूवात केली पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो बाद झाल्यानंतर पंजाबची फलंदाजी कोलमडली.शिखर धवन (16), लियम लिव्हिंगस्टोन (19), राज बावा (11), शाहरूख खान (0) आणि हरप्रीत ब्रार (14), राहुल चहर (0) हे सर्व फलंदाज झटपट माघारी परतले.

रबाडाच्या फटकेबाजीने राखली लाज भानुका राजपक्षेने 9 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारासोबत 31 धावा केल्या. कगिसो रबाडाला पंजाबकडून पदार्पणाची संधी मिळाली. त्याने दमदार कामगिरी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून देण्यात मोठी भूमिका बजावली. रबाडाने 16 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकार खेचत 25 धावांची उपयुक्त खेळी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या