Thursday, April 25, 2024
Homeजळगावम्हणून आ. चिमणराव पाटील आज घेणार कृषीमंत्र्यांची भेट..

म्हणून आ. चिमणराव पाटील आज घेणार कृषीमंत्र्यांची भेट..

पारोळा – (Parola)

जळगांव जिल्हा हा केळी उत्पादनात अग्रेसर असून जिल्यातील प्रमुख पिक केळी (banana) आहे. असे असतांना केळीचे खरेदीदार व्यापारी (Buyer Merchant) केळी प्रति क्विंटल १५० ते २५० रुपये दराने खरेदी करीत आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे (farmers) फार मोठे आर्थिक नुकसान (Financial loss) होत आहे. याबाबत कृषी मंत्र्यांनी हस्तक्षेप करावा या मागणीसाठी आ. चिमणराव पाटील (MLA Chimanrao Patil) हे उद्या 14 डिसेबर रोजी कृषीमंत्री ना. दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांची भेट घेणार आहेत.

- Advertisement -

केळी उत्पादन खर्च खूप मोठा असतांना १५० ते २५० प्रति क्विंटल भावाने खरेदी व्यापारी करीत आहे. तसेच तोच केळीचा माल किरकोळ विक्रेते २५-३० रुपये डझन दराने विक्री करीत आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत. यास्तव केळी भावात त्वरित हस्तक्षेप करा, अन्यथा शेतकरी उध्वस्त होईल म्हणून केळी उत्पादक शेतकरी व व्यापारी यांची तातडीची बैठक बोलविण्यात यावी.

केळी उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देणे कामी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे, पणनमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे कडे पत्रान्वये केली आहे. या मागणीसाठी आमदार चिमणराव पाटील याबाबत राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांची १४ डिसेंबर रोजी भेट घेणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या