Friday, April 26, 2024
Homeनाशिकलग्नातून बॅगा चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

लग्नातून बॅगा चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

शहर तसेच परिसरातील मंगल कार्यालयातील लग्नसोहळ्यात जाऊन चोरी करणार्‍या आंतरराज्य टोळीला शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा एकच्या विभागाने मध्यप्रदेशातील इंदौर येथून जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 7 लाख बारा हजार रूपयांचा मुद्देमाल कारसह हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisement -

अजयसिंग कप्तानसिंग कोडान उर्फ सिसोदिया (25), बादल कृष्णा सिसोदिया (19), पार्वतसिंग मिस्त्रीलाल सिसोदिया (45, सर्व रा. गुलखेडी, राजगड, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

मागील काही दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या मंगल कार्यालय मधील लग्नसोहळ्यात दागिणे, मौल्यवान वस्तुंच्या बॅग चोरी होण्याच्या घटना वाढल्या होत्या. याबाबत पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिल्यानंतर पोलिस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार सहाय्यक पोलिस आयुक्त ठाकूर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा एकच्या कर्मचार्‍यांनी अशा आंतरराज्य टोळीला जेरबंद केले आहे.

मध्यप्रदेश वरून नाशिकला येऊन ही टोळी मंगल कार्यालय मध्ये जाऊन दागिन्यांची चोरी करत होती. गुन्हे शाखाखेचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी पोलीस कर्मचारी शिवाजी महाले विशाल ताठे राहुल पालखेड विशाल देवरे गणेश वडजे मोतीराम चव्हाण असिफ तांबोळी यांच्या पथकाने मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथे कर्मचार्‍यांनी मिळालेल्या माहितीनुसार एका धाब्यावर सापळा रचून, छापा टाकून या टोळीला जेरबंद केले आहे.

त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून 7 लाख 12 हजार रुपये जप्त करण्यात आला आहे तसेच त्यांच्याकडून एक स्विफ्ट डिझायर गाडी देखील जप्त करण्यात आली आहे. त्यांनी राज्यातील पुणे-मुंबई संगमनेर नासिक तसेच गुजरात राज्यात विविध ठिकाणी मंगल कार्यालयात जाऊन चोरी केले आहे.

ज्या नागरिकांच्या मंगल कार्यालय मध्ये चोरी झाली ची घटना घडली असेल त्यांनी नाशिक पोलिस आयुक्तालयाची संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आनंदा वाघ यांनी केले आहे.

चार दिवस पाठलाग

कोणताही पुरावा नसताना केवळ चोरी करण्याची पद्धतीवरून काही टोळ्यांचा अभ्यास व तोकडी माहिती घेऊन गुन्हे शाखा एकचे पथक मध्यप्रदेशला दाखल झाले होते.

सलग चार दिवस या टोळीचा पाठलाग करत हे पथक करत होते. अखेरी इंदौर परिसरात एका ढाब्यावर जेवणासाठी हे थांबले असता छापा टाकून पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या