Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रऔरंगाबादेत इंटरनेट सेवा विस्कळीत !

औरंगाबादेत इंटरनेट सेवा विस्कळीत !

औरंगाबाद – Aurangabad – प्रतिनिधी :

औरंगाबाद शहरात मोबाईल ग्राहकांची संख्या ही झपाट्याने वाढत असताना आहेत ते टॉवरही पालिकेने कर वसूलीसाठी सील केल्याने शहरात अघोषीत “मोबाईल आणिबाणी’ निर्माण झाली आहे.

- Advertisement -

अनेक टॉवर सील केल्याने कॉल ड्रॉप, अस्पष्ट आवाज, कन्झेशन आणि इंटरनेटची स्पीड घटल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. दर्जेदार मोबाईल सेवेसाठी शहरभर अजून किमान १५० टॉवरची गरज आहे.

एरवी बील न भरल्याने एका दिवसात ग्राहकांचे फोन कापणाऱ्या मोबाईल कंपन्या वर्षाेनवर्षे पालिकेचा मालमत्ता कर थकवत आहे. कारवाईचा बडगा उभारताच तुटपूंजा करत भरत टॉवर खुले करतात.

चालू-बंदच्या या खेळात ग्राहक भरडला जातोय. शहरात एकूण ६४२ मोबाईल टॉवर्स असून पैकी ६२ कायदेशीर आहेत. कायदेशीरच्या तुलनेत बेकायदेशीर टॉवर्सची संख्या ५८० म्हणजेच १० पट अधिक असल्याची माहिती पालिकेच्या कर निर्धारक व संकलक अधिकारी अॅड.अपर्णा थेटे यांनी दिली.

३५.८९ कोटीची थकबाकी
एका टॉवरला ६ महिन्याला ७५ हजार ते १ लाख रूपये मालमत्ता कर लागतो. बेकादेशीर टॉवरला दुप्पट कर लागतो. अधिकृत ६२ टॉवरकडे १,५१,५०४५४ रूपये थकबाकी, ८,८७,८९०२ चालू मागणी अशी २,४०,२९३५६ रूपये येेणे आहे. पैकी ५४४०६३४ वसूल तर १,८५,५७२५४ रूपये शिल्लक आहेत. अनधिकृत ६४२ टॉवरकडे थकबाकी २७,०६५९०२२ तर चालू मागणी १५,९६,३५४९५ अशी ४३,०२,९४५१७ रक्कम येणे आहे. पैकी ८,९६,६४४७८ वसूली झाली असून ३४,०३,४९५०७ रूपये शिल्लक आहे. दोन्ही मिळून ३५,८९,०६७६१ रूपयांची थकबाकी आहे.

कोणाचे किती टॉवर
शहरात इंडस कंपनीचे १७९, जिओ-१६१, एटीसी-१११, व्हीआय-५९, एअरटेल-६०, बीएसएनएल-५१ तर एस्सार, टाटा टेलिकॉम, टीफको, जीटीएल या कंपन्यांचे मिळून २१ टॉवर आहेत. एटीसी आणि इंडस टॉवर उभारणी करून माेबाईल कंपन्यांना देतात. एका टॉवरवर ३-४ कंपन्यांचे काम चालते. यामुळे एक टॉवर सील केले तरी विविध कंपन्यांच्या मोबाइल वापरात अडचण येते.

४५ टॉवरला टाळे
वसूलीसाठी पालिकेने ४५ टॉवर सील केले आहेत. सर्वाधिक टॉवर असणाऱ्या एटीसी आणि इंडसकडे सर्वाधिक थकबाकी होती. त्यांचे सर्वात मोठे ग्राहक व्हीआय असल्याने टॉवर सील केल्याने ही सेवा प्रभावीत झाली. कंपन्यांनी न्यायालयात धाव घेवून थकबाकीच्या ५० टक्के रक्कम भरण्याचे मान्य केले. मध्यतंरी रिलायन्स इन्फ्राने २२,०६१ रूपयांची थकबाकी अदा केली.

टॉवर बंद, इंधन संपले
टॉवरमधील यंत्रणा सुरू ठेवण्यासाठी बॅटरी आणि जनरेटर लागते. यात फारतर एका दिवसांचे इंधन असते. टॉवर सील करतांना याचे किटकॅट पालिका जप्त करते. इंधन संपल्यावर यंत्रणा बंद पडते.

२.५ लाख ग्राहकांना फटका
एका टॉवरवरून अर्धा-पाऊण किलोमीटरच्या परिघात सेवा मिळते. सतत एका ठिकाणी राहणाऱ्या ग्राहकांला त्याच्या जवळील टॉवरवरून सेवा मिळते. ते बंद असल्यास सेवेचा दर्जा खालावतो. प्रवासा दरम्यान अापोआप दुसऱ्या टॉवरवर स्वीच होतोे. बाबा पेट्रोलपंप ते सिडको बसस्टँडच्या प्रवासासाठी १० ते १२ टॉवरवरून सिग्नल मिळतात. एका टॉवरवरून दिवसाकाठी ४ ते ४.५ हजार कॉल ट्रॉंझिट होतात. ४५ टॉवर सील झाल्यामुळे २ ते २.२५ लाख कॉलवर परिणाम होतोय.

- Advertisment -

ताज्या बातम्या