Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारनंदुरबारात आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचे आयोजन

नंदुरबारात आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचे आयोजन

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

नंदुरबार शहरात येत्या 20 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाटयमंदिरात स्प्राऊंटींग सीड इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टीवल 2020 चे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

खानदेशात प्रथमच होणार्‍या आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवात जगभरातील 35 देशातून 471 लघू चित्रपट सहभागी झाले असून त्यातून उत्कृष्ट निवडक लघूपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

विजेत्या चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. हा सोहळा रसिक प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे,अशी माहिती आंतरराष्ट्रीय लघूपट महोत्सवाचे संचालक डॉ.सुजित पाटील यांनी पत्रकार परीषदेत दिली. या महोत्सवात एकुण 29 विविध प्रवर्गातून 83 जणांना पारितोषिक देण्यात येणार आहेत.

डॉ.सुजित पाटील म्हणाले, या ऐतिहासिक व नाविन्यपूर्ण सोहळयास आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी, भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्तया व खा.डॉ.हीना गावित, जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड.सिमा वळवी, आ.डॉ.विजयकुमार गावित, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, आ.शिरीषकुमार नाईक, आ.राजेश पाडवी, नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेेंद्रकुमार गावित,जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. आयोजन समितीचे फेस्टीवल डायरेक्टर डॉ.सुजित पाटील, फेस्टीवल चिफ डॉ.प्रकाश ठाकरे, फेस्टीवल अ‍ॅडव्हायझर डॉ.सी.डी.महाजन, डॉ.रोशन भंडारी, डॉ.राजेश कोळी, सुपरवाझर डॉ.राजेश वळवी, मीडिया हेड रणजितसिंग राजपूत, फेस्टीवल कोऑर्डीनेटर डॉ.खुशालसिंग राजपूत, मार्केटींग अ‍ॅडव्हायझर डॉ.आरीफ बट, ग्राफिक्स हितेशकुमार सारंगी, योगेंद्र पाटील आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे.

डॉ.आलोक सोनी भारत, यंग मान कांग अमेरिका, थॉमस गॉर्श जर्मनी, अलि घियास्वांद इराण, मोंजूरूल इस्लाम मेघ बांग्लादेश, युसुफ काझमी भारत, श्याम रंजनकर भारत, नज्जो फजल खान भारत, सुुभाष पाटील भारत व शुभम अपुर्वा भारत आदी आंतरराष्ट्रीय ज्यूरी या महोत्सवासाठी लाभले आहेत.

खानदेशात प्रथमच अशा पध्दतीने नाविन्यपुर्ण सोहळा होत आहेत. या महोत्सवात एकुण 29 विविध प्रवर्गातून 83 जणांना पारितोषिक देण्यात येणार आहेत. तत्पुर्वी सकाळी 9 ते 4 या वेळेत पारितोषिकप्राप्त चित्रपट नाटयमंदिरात दाखविण्यात येणार आहेत. या सोहळयाचा रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.पाटील यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या