International Men’s Day 2021 : जागतिक पुरुष दिन आजच का साजरा करतात?

jalgaon-digital
2 Min Read

‘कुटुंबाचा पोशिंदा, आधार अशी बिरुदे लावणाऱ्या पुरुषांकडून नेहमीच खंबीरपणाची अपेक्षा ठेवली जाते. पुरुषांची जबाबदारी, कर्तव्यांबाबत नेहमीच चर्चा होते. मात्र, त्यांच्या अधिकाराबाबत फारसे बोलले जात नाही.’

स्त्री वर होणारे अन्याय समोर आणताना (त्याची गरज निश्चितच आहे) समाजातील तेवढाच महत्वाचा पुरुष वर्ग अनेकदा अनावधानाने आपल्याकडूनही डावलला जातो. अशाच बाजूला सारल्या गेलेल्या पुरुषांच्या सन्मानासाठी दरवर्षी १९नोव्हेंबर रोजी जागतिक पुरुष दिन (International Men’s Day) साजरा केला जातो.

PayTM : पेटीएमचा शेअर का गडगडला?, जाणून घ्या काय म्हणताय तज्ज्ञ

जगभरातील ६० पेक्षा जास्त देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. १९९९ मध्ये पहिला पुरुष दिन साजा करण्यात आला. भारतात त्यानंतर आठ वर्षांनी म्हणजेच १९ नोव्हेंबर २००७ रोजी पहिल्यांदा जागतिक पुरुष दिन साजरा करण्यात आला.

पुरुषांसोबत होणारा भेदभाव, शोषण, होणारी हिंसा रोखन्यासाठी, त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणं, आणि त्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

पुरूषप्रधान संस्कृती म्हणवून घेणाऱ्या देशात कधी पुरुषांच्या समस्यांवर चर्चाच होत नाही. अनेक तरुण आणि पुरुष तणावात असताना आत्महत्येचा अंतिम पर्याय स्वीकारतात. जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलेल्या अहवालानुसार भारतात दर दहा हजार पुरुषांमध्ये २५८० पुरुष हे आत्महत्या करतात. भारतात पुरुषांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण हे २५.८% आहे.

यात १५ ते २९ वर्षांच्या मुलांचा आणि पुरुषांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे, तर महिलांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण हे १६.४ % आहे. पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर काम करणारी संस्था सीएएलएमच्या अहवालानुसार बेरोजगारी वाढली की पुरुषांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढतं. बेरोजगारीच्या दरात १ टक्क्यांनी जरी वाढ झाली तरी पुरूषांच्या आत्महत्येचं प्रमाण हे ०.७९% नी वाढत असल्याचं नमूद केलंय.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *