Wednesday, April 24, 2024
Homeनगरआंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ

खैरी निमगाव |वार्ताहर| Khairi Nimgav

गेल्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरामध्ये नरमाई आली आहे. यामुळे सोयाबीनची विक्री करावी की नाही, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा राहिला आहे. भाव आणखी कमी होतील की काय या भितीने शेतकर्‍यांनी पॅनिक सेल करू नये. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढल्यामुळे येत्या काही दिवसांत सोयाबीन दरात वाढ होणार असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला असताना बाजारातील दरामुळे शेतकर्‍यांचा खर्च निघणेही कठीण झाले आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे स्थानिक बाजारातही सोयाबीनचे दर वाढून शेतकर्‍यांना आधार मिळू शकतो. मागील तीन दिवसांत सोयाबीनला मिळत असलेल्या दराहून याची प्रचिती येत आहे. ‘सीड क्वॉलिटी’ सोयाबीनने पुन्हा कमाल 7 हजार रुपये प्रती क्विंटलचा टप्पा गाठला, तर तुलनेत मिल क्वॉलिटी सोयाबीनलाही 5 हजार 500 च्या पुढे दर मिळत असल्याचे चित्र आहे.

मागील काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात सुधारणा झाली होती. परंतु याचा परिणाम दरावर काही दिसून आला नव्हता. आता मात्र, आंतरराष्ट्रीय दरवाढीचा परिणाम देशातील बाजारावर होत असल्याचे दिसत आहे. यामुळे शेतकर्‍यांनाही सोयाबिन दरवाढीला याचा आधार मिळणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढल्यामुळे येत्या काही दिवसात सोयाबीन दरात वाढ होणार असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. त्यातच गत आठवड्यात सोयापेंडच्या दरात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे सोयाबीन तेलात देखील वाढ झाल्याची माहिती मिळते आहे. त्याचाच मोठा परिणाम सोयाबीनच्या दरावर होणार असल्याचे दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढल्याने स्थानिक बाजारातही तेजी येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्याची स्थिती समाधानकारक आहे. परंतु आंतराष्ट्रीय बाजारात मागणी आणि दर वाढले तरी आमचा माल बेभावच घेतला जातो. त्यामुळे प्रत्यक्ष दर वाढतील तेव्हाच खरं मानू, असे मतही शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे सोयाबीन नवीन वर्षाखेरीस शेतकर्‍यांच्या घरातून बाहेर निघेल, असे तुर्तास तरी शक्य वाटत नाही.

मागील काही दिवसांपूर्वीही सोयाबीन सात हजारांचा टप्पा गाठेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. बाजारात सोयाबीनची आवक वाढविण्यासाठी हा प्रकार केला जातो. सध्या सोयाबीनला बर्‍यापैकी दर मिळत असले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर दराचा प्रत्यक्ष किती परिणाम होतो, ते पाहणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या