Thursday, April 25, 2024
Homeनगरप्रशांत भालेराव यांना इंटरनॅशनल ग्लोरी अवार्ड पुरस्कार जाहीर

प्रशांत भालेराव यांना इंटरनॅशनल ग्लोरी अवार्ड पुरस्कार जाहीर

शेवगाव | तालुका प्रतिनिधी

देशातील नऊ राज्यात 110 शाखा व दहा लाख खातेदार असलेल्या श्री रेणुका माता मल्टिस्टेट अर्बन क्रेडीट सोसायटीचे (Renuka Mata Multistate Urban Credit Society) संस्थेचे प्रवर्तक प्रशांत भालेराव (Prashant Bhalerao) यांना मुंबईच्या (Mumbai) कनेक्ट स्टार संस्थेच्यावतीने (Connect Star organization) आर्थिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात विशेष कार्य करणार्‍या व्यक्तींना देण्यात येणारा इंटरनॅशनल ग्लोरी अवार्ड 2021 (International Glory Award 2021) हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

- Advertisement -

प्रसिद्ध सिनेस्टार सोनू सूद (Actor Sonu Sud) यांचे हस्ते आज शनिवारी (दि.28) गोव्यातील (Goa) पणजी (Panji) येथील रिसॉर्टमध्ये या पुरस्कार वितरण सोहळ्यात भालेराव यांना महाराष्ट्राचे उगवते आर्थिक मार्गदर्शक म्हणून इंटरनॅशनल ग्लोरी अवार्ड 2021 (International Glory Award 2021) हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

शेअर मार्केट (Stock market), कम्युडीटी मार्केट (Commodity market), विमा (Insurance), बँकिंग (Banking) आदी क्षेत्रातील गुंतवणूकीसाठी, तसेच रियल इस्टेट व आंतरराष्ट्रीय गुंतवणुकी (Real estate and international investment) संदर्भात, उद्योगधंदे उभारणीसाठी घेण्यात येणार्‍या कर्जाच्या आणि कंपनीचे शेअर बाजारात उतरविण्या संदर्भातही भालेराव सातत्याने विशेष मार्गदर्शन करत असतात. या कार्याची आणि आर्थिक क्षेत्रात ते देत असलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

भालेराव यांना जाहीर झालेल्या या आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल तारकेश्वर गडाचे महंत शांतिब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री, हनुमान टाकळीचे महंत अप्पा महाराज, आखेगावच्या जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रमुख राम महाराज झिंजूर्के, पाथर्डीचे प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके, प्रा.जनार्दन लांडे पाटील आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या